विशेष प्रतिनिधी
मुंबई : Praveen Darekar शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे नेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांना पातळी नाही, ते विकृत राजकीय पुढारी असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, आव्हाड यांना पातळी नाही, ते विकृत राजकीय पुढारी आहेत. विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुत्कार मतांच्या लालसेपोटी करत आहेत. एका बाजूला जितेंद्र आव्हाड यांनी उभे राहावे, दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी उभे राहावे मग तुलना करावी, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपाने कृतज्ञतेच्या भावनेतून अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा. महायुती म्हणूनच आम्ही समोर जाणार, असल्याचे दरेकर यांनी म्हणले आहे.Praveen Darekar
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या घोषणेवर देखील प्रवीण दरेकरांनी भाष्य केले आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, अशीच घोषणा करत राहा. देवेंद्र फडणवीस तुमच्या नादाला लागत नाहीत, त्यांच्यासमोर केवळ तुम्ही एकच प्रश्न नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.Praveen Darekar
काय म्हणाले होते आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात. जाताना त्यांच्याकडील घड्याळ देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे. अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असे आव्हान देखील त्यांनी केले होते. जितेंद्र आव्हाड सध्या मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत.
Praveen Darekar reply to Jitendra Awhad
महत्वाच्या बातम्या
- RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका
- Uddhav Thackeray group उध्दव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे का? मनसेचा घणाघात
- Jammu and Kashmir’ : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी हल्ला; यूपीतील 2 तरुणांवर गोळीबार; 12 दिवसांपूर्वी 7 जणांची हत्या
- Pakistan : पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटात 7 ठार, 23 जखमी; मृतांमध्ये 5 मुले आणि पोलिसांचा समावेश