नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच घेतला हा मोठा निर्णय
विशेष प्रतिनिधी
पुणे : विक्रमादित्य ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची नुकतीच नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रशांत दामले हे सोनी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रम ” कोण होणार करोडपती या कार्यक्रमात त्यांनी त्यांची नाटकाच्या प्रवासातील सहनायिका कविता लाड या जोडगोळीनं हजेरी लावली. Prashant Damle Akhil Bhartiyamarathi Natya Parishad
प्रशांत दामले आणि कविता लाड हे दोघे येथील भारतीय मराठी नाट्य परिषदेसाठी या खेळात हॉटसीटवर बसले आहे. हा खेळ ते नाट्य परिषदेसाठी खेळत आहेत. आणि या खेळात जिंकलेली रक्कम ते मराठी नाट्य परिषदेला देणार आहेत.
या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे . मराठी नाट्य संस्कृतीच्या मराठी नाट्य चळवळीच्या भवितव्यासाठी हा खेळ असणार आहे. भागात प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. ह्या विशेष भागाची सुरुवात प्रशांत दामले त्यांच्या ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याने झाली आहे.
त्यामुळे मंचावर एकदम वेगळेच वातावरण तयार झाले.प्रशांत दामले यांनी मोरूची मावशी नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. सुरुवातीला १६१ प्रयोग होईपर्यंत हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजले नव्हते. त्यानंतर दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी त्यातील गाणे सादर केले.
ते गाणे प्रेक्षकांना इतके आवडले की त्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.त्यापुढील आजपर्यंतचे सगळे प्रयोग हाऊसफूल गेले, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली. कविता लाड यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे फार कौतुक केले. त्यांच्यासारखा नट रंगभूमीवर सतत काम करतो आहे, त्यामुळे सगळ्यांनाच कामाचा हुरूप येतो. याचं दरम्यान प्रशांत दामले यांनी काही ठरावीक नाट्यगृहांत प्रयोग का करत नाहीत, याबद्दल त्यांनी सांगितले.
Prashant Damle Akhil Bhartiyamarathi Natya Parishad
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार किंग मेकर नव्हे किंग ब्रेकर, ते सरकारे बनवण्यापेक्षा तोडण्यात माहीर; फडणवीसांचा प्रहार
- “ज्यांच्यामुळे इतकी वर्षे मुख्यमंत्री राहिलात, त्यांचा…” बिहारमध्ये अमित शाहांचा नितीश कुमारांवर निशाणा!
- पवारांनी मला नव्हे, पुतण्याला क्लीन बोल्ड केले, माझ्यामुळे ते अर्धसत्य तरी बोलले; फडणवीसांचा तिखट वार!!
- तामिळनाडू घटनात्मक संघर्ष; तुरुंगवासी मंत्री सेंथिल बालाजींना राज्यपालांनी हटविले; संतप्त मुख्यमंत्री जाणार कोर्टात!!