• Download App
    प्रणिती शिंदे यांची बैठक कॉँग्रेसच्या नेत्यांना भोवली, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरींसह पदाधिकाºयांवर गुन्हा दाखल|Praniti Shinde's meeting surrounds Congress leaders, MLA Shirish Chaudhary and office bearers charged for violating rules

    प्रणिती शिंदे यांची बैठक कॉँग्रेसच्या नेत्यांना भोवली, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरींसह पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

    कॉँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली बैठक जळगाव जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेत्यांना चांगलीच भोवली आहे. कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह 20 ते 25 काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Praniti Shinde’s meeting surrounds Congress leaders, MLA Shirish Chaudhary and office bearers charged for violating rules


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : कॉँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली बैठक जळगाव जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेत्यांना चांगलीच भोवली आहे.

    कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह 20 ते 25 काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    आमदार प्रणिती शिंदे १५ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत अजिंठा शासकीय विश्रामगृहावर दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत पक्षाचे पदाधिकारी व महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

    या बैठकीचे आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप पाटील यांनी केले होते. या बैठकीसाठी कॉँग्रेसने पोलीस व जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नव्हती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचा अभाव होता,तर काही जण विना मास्क होते.

    रावेरचे कॉंग्रेस आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी अध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Praniti Shinde’s meeting surrounds Congress leaders, MLA Shirish Chaudhary and office bearers charged for violating rules

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!