विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Mahajan नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांनी खरातला 117 वेळेस कॉल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा कॉल केल्याचा दावा केला आहे. हे कॉल नेमके कशासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी विचारला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांना तातडीने अटक करून त्यांना हे कॉल डिटेल्स कोणी आणि कोणत्या अधिकारात दिले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.Prakash Mahajan
प्रकाश महाजन म्हणाले, अंजली दमानिया यांना अटक करुन त्यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा. अंजली दमानिया स्वतःला काय पोलिस महासंचालक समजत आहेत का? त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात? हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशी बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना कॉल डिटेल्स मिळतात कसे? याची चौकशी करा, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.Prakash Mahajan
टिव टिव बंद केली पाहिजे- संजय गायकवाड
अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आपला देश हा हिंदू धर्मियांचा देश आहे व देवी-देवतांना मानणारा देश आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोंदू खरातच्या पोटात काय आहे हे थोडेच माहिती होते. त्यामुळे कोणी कोणासोबत फोटो काढला किंवा कुणाला कॉल केला त्याचा अर्थ असा होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे हे बेशरमाचे लक्षण आहे व या ज्या काही दोन-तीन बाया (महिला) टिव टिव करतात. त्यांनी ते बंद केले पाहिजे विनाकारण त्यांनी राजकारण करू नये. त्या भोंदू बाबा ने जे काही केले असेल ते बाहेर काढले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
Arrest Anjali Damania: Prakash Mahajan Slams Activist Over Shinde CDR Leak
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!