विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी भावी यासाठी चर्चेची गुऱ्हाळे चालली, पण त्यातून राजकीय रस काही गळला नाही. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्या. आता त्यातले अकोला लोकसभेतले मतदान संपले आहे. त्यामुळे थोडे “निवांत” झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. Prakash Ambedkar’s new proposal to the Congress for the Legislative Assembly
लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी समोर वेगवेगळे फॉर्म्युला ठेवले होते. त्यात “बाराचाही फॉर्म्युला होता. म्हणजे महाराष्ट्रात 48 पैकी प्रत्येकी 12 जागांवर 4 पक्षांनी लढण्याचा हा फॉर्म्युला होता. पण महाविकास आघाडीतल्या ठाकरे – पवारांना आणि काँग्रेसला तो फॉर्म्युला पटला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येऊ शकले नाहीत. पण आता लोकसभा निवडणुकीच्या ऐन मध्यावर प्रकाश आंबेडकर यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा फॉर्म्युला काँग्रेसला सुचवल्याची बातमी आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यासाठी तयारी करायला हवी, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे, असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे लोकसभेला 48 जागांवर फेस कटल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चेची किती आणि कशी गुऱ्हाळे चालतील आणि त्यातून राजकीय रस किती कळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– मुंबईत उमेदवार देणार
आम्ही मुंबईतही उमेदवार देणार आहोत, अशी माहिती प्रकश आंबेडकर यांनी दिली. ‘मुंबईत आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना त्यांचा विधानसभा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिली आहे. त्यांना काँग्रेसने बळीची बकरी केली आहे. भाई जगताप त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांना डावलून बाहेरचा उमेदवार दिला. काँग्रेसचा या खेळीचा आम्हाला फायदा होणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
Prakash Ambedkar’s new proposal to the Congress for the Legislative Assembly
महत्वाच्या बातम्या
- घुसखोरांना एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव – केशव प्रसाद मौर्य
- मोदी म्हणाले कदाचित मी मागील जन्मी इथेच जन्मलो असेल, नाहीतर…
- भाजप खासदार रवी किशन यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा!
- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!