विशेष प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवून त्यातच आरक्षण कायमचे संपवायला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष एकत्र आले आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. Prakash Ambedkar Target four party
प्रकाश आंबेडकर म्हणाले
मनोज जरांगे त्यांची मागणी शासनाने सोडवली नाही म्हणून तो आता कळीचा मुद्दा झाला आहे. ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी जरांगे यांची मागणी आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ही भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. ओबीसींच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
रत्नागिरीच्या सभेमध्ये शरद पवारांनी जरांगे पाटलांची मागणी योग्य असल्याचे म्हणत त्यांना पाठिंबा दिला. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीची आहे, असे स्पष्ट होते. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींनाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये, ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण द्यावं. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल. Prakash Ambedkar
आरक्षण कायमचे संपवायला काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष एकत्र आलेआहेत. आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल. रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवेल. या निवडणुकांमध्ये होणारे ध्रुवीकरण हे सामाजिक दृष्टिकोनातून होणार आहे. या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे. ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे ते एका बाजूला राहतील. ओबीसी फॅक्टर आरक्षण वाचलं पाहिजे या भूमिकेतून मराठा आरक्षण विरोधी नेतृत्व करणार आहे. Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Target four party
महत्वाच्या बातम्या
- Udaynidhi Stalin : सनातन धर्माला शिव्या देणाऱ्या चिरंजीवाला स्टालिन यांची बक्षिसी; उदयनिधी तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदी!!
- ‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
- Jaish e Mohammed : काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला ; जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना अटक
- Mahatma Phule : महात्मा फुले ब्राह्मणांचे विरोधक नव्हते, ते फक्त ब्राह्मण्यवादाचे विरोधक, त्यांनी ब्राह्मणांच्या वाड्यात शाळा काढल्या!!