• Download App
    PM Modi Completely Compromised: Prakash Ambedkar’s Sharp Attack Over Epstein Files PM नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेत; देशाच्या विरोधात निर्णय घेत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोलVIDEOS

    Prakash Ambedkar : PM नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेत; देशाच्या विरोधात निर्णय घेत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल

    Prakash Ambedkar

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Prakash Ambedkar इराण-अमेरिका व इस्राइल युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा भारतालाही काही प्रमाणात बसत असल्याचे दिसत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत सरकारची चांगलीच गोची केली आहे. एपस्टीन फाइलवरून देखील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली आहे.Prakash Ambedkar

    प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ होते. तसेच आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी होते व काही डाव्या पक्षांचे प्रतिनिधी होते. आता आम्ही 23 तारखेला आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती दिली.Prakash Ambedkar



    एपस्टीन फाइलमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव

    पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यात आरएसएसची कोणतीही भूमिका नव्हती. तो सामाजिक लढा असेल किंवा राजकीय असेल. आरएसएस तुम्ही भूमिका का घेत नाही? ज्याचे चारित्र्य चांगले नाही असा पंतप्रधान तुम्हाला चालतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झाले आहेत आणि कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे त्यांनी देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. एपस्टीन फाइलमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे आणि त्यांनी देशाचे सार्वभौम हे एका प्रकारे किंवा अमेरिकेसमोर गहाण ठेवले आहे, अशी परिस्थिती आहे.

    अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी नाचत आहेत

    नरेंद्र मोदी यांनी खाडी युद्धात भारतावर सार्वभौम नाही तर आमची सत्ता आहे, आम्ही सांगू तेच भारत करेल असे दाखवण्यासाठी अमेरिकाने नरेंद्र मोदी यांना मुभा काय दिली तर रशियाकडून तुम्ही तेल विकत घेऊ शकता. अगोदरचे आदेश बंद करा, आत्ताचे आदेश तुम्ही विकत घेऊ शकता, आणि नरेंद्र मोदी हे कॉम्प्रोमाइज झाले आहेत आणि अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी नाचत आहेत अशीच ही परिस्थिती आहे, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

    दरम्यान, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी प्रकाश आंबेडकर हे छत्रपती संभाजीनगर येथे आले होते.

    PM Modi Completely Compromised: Prakash Ambedkar’s Sharp Attack Over Epstein Files VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asim Sarode : धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा; धर्मस्वातंत्र्य विधेयकावर असीम सरोदेंची टीका, म्हणाले- समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप

    Petrol-Diesel : सरकारने म्हटले- पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, LPG चिंतेचा विषय; दररोज 75.7 लाख सिलिंडर बुक होत आहेत