वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
विशेष प्रतिनिधी
अकोलाः कोरोनाने थैमान घातले असताना राज्य सरकारचे प्रयत्न तोकडे पडत असल्याच चित्र निर्माण झालंय. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीकोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. Prakash Ambedkar slams Cm Uddhav Thackeray and ajit pawar on corona crisis
मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती
सध्या महाराष्ट्र शासन पूर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरतीच असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावलाय. यामुळेच उच्च न्यायालयच सर्व आदेश देत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नवाब मलिक राज्य सरकारकडून बळीचा बकरा
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरूनही हल्लाबोल केला होता. आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली होती. नवाब मलिकांना राज्य सरकारकडून बळीचा बकरा केलं जात असल्याचं आंबेडकर म्हणाले होते.
Prakash Ambedkar slams Cm Uddhav Thackeray and ajit pawar on corona crisis
महत्त्वाच्या बातम्या
- रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठा बहाल ; चक्रीवादळानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तप्तरता
- कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी कुचकामी, उपचारातून हटविली ; एम्स, आयसीएमआरकडून नवीनमार्गदर्शक तत्वे जारी
- Corona Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तब्बल 48 हजार जणांना डिस्चार्ज
- प्रायव्हसी पॉलिसी कायद्यानुसारच असल्याचे व्हॉट्सअॅपचे न्यायालयात स्पष्टीकरण, पालन केले नाही तर अकाऊंट नष्ट केले जाणार
- भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका
- लोकांना धीर देण्याऐवजी विरोधक घाबरवत आहेत, योगी आदित्यनाथ यांचा आरोप