विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही देण्या – घेण्याच्या, काही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याच्या दिवस नुसत्या चर्चांचा!!, असे आज घडले.Prakash ambedkar – sharad pawar meeting and uddhav thackeray – Sanjay pandey meeting raised eyebrows
सकाळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन चर्चा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” या ग्रंथाच्या शताब्दी निमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर मुख्य वक्ते होते.
या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना कॉफी पानासाठी बोलवले. त्यावेळी तिथे शरद पवार होते. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यात काही विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी तिथे 12 लोक उपस्थित होते, असे नंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले. शरद पवारांशी विविध विषयांवर चर्चा केली असली तरी त्यामध्ये महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही. भोवतली 12 लोक असताना अशी चर्चा होत नसते, असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला तरी देखील शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी बंद दाराआड चर्चा केल्याच्या बातम्या माध्यमांनी रंगविल्या.
त्यातून शरद पवार 1998 चा फॉर्म्युला परत आणत आहेत का??, अशी चर्चा ही माध्यमांनी घडविली. 1998 मध्ये सर्व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीत मदत करून निवडून आणले होते. त्यामुळे वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षांचे 4 खासदार झाले होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर रिपब्लिकन नेत्यांना मदतीला घेऊन आपला राजकीय प्रभाव पुनर्स्थापित करण्याचा पवारांचा मनसुबा आहे का??, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या भेटीकडे पाहिले जाते, पण प्रकाश आंबेडकरांनी मात्र त्यातल्या राजकीय चर्चेचा इन्कार करून बातम्यांमध्ये हवा काढून घेतली.
उद्धव ठाकरे – संजय पांडे चर्चा
मुंबईचे पोलीस आयुक्त माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे यांची “मातोश्री” मध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी बंद दाराआड सुमारे दोन तास चर्चा केली. ड्रग्स तस्कर ललित पाटीलला झालेली फेरअटक, त्या अटकेनंतर त्याचे शिवसेनेशी प्रस्थापित असलेले संबंध उघडकीस येणे, त्याच दिवशी आदित्य ठाकरेंचेकडून कोर्टात कॅव्हेट दाखल होणे, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सेलियन यांच्या हत्येच्या गूढावरून हळूहळू पडदा दूर होत जाणे या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणे याला विशेष महत्त्व आहे.
संजय पांडे हे ठाकरे – पवार सरकारच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधील काही फोन टॅप केल्या प्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली होती. सगळी गुंतागुंतीची प्रकरणे एकाच वेळी बाहेर येत असताना उद्धव ठाकरे आणि संजय पांडे यांच्यात “मातोश्री” मध्ये भेट होणे आणि त्यांच्यात बंद दाराआड चर्चा होणे याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ललित पाटीलला झालेल्या अटकेनंतर आणखी कोणती आणि किती रहस्य बाहेर येणार??, याविषयी महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिली आहे.
Prakash ambedkar – sharad pawar meeting and uddhav thackeray – Sanjay pandey meeting raised eyebrows
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही पुन्हा इतिहास रचला आहे…”, गगनयान मिशनच्या क्रू मॉड्यूलच्या यशस्वी प्रक्षेपणावर इस्रो प्रमुखांचं विधान!
- Israel Hamas War : हमासने दोन अमेरिकन ओलिसांची सुटका केली, ब्लिंकन यांनी मध्यस्थीसाठी मानले कतारचे आभार
- कंत्राटी भरतीचे जंजाळ; पण ज्यांनी सुरू केली, तेच करताहेत आज बवाल!!
- डाबरच्या हेअर रिलॅक्सरमुळे कॅन्सरच्या दाव्याने खळबळ; अमेरिकेच्या फेडरल कोर्टात तब्बल 5,400 खटले दाखल, कंपनीचे शेअर्स घसरले