• Download App
    प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी काडीमोड; जरांगे + ओबीसी आघाडीशी जुळविले सूत!! Prakash Ambedkar not association with Mahavikas Aghadi

    प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी काडीमोड; जरांगे + ओबीसी आघाडीशी जुळविले सूत!! वंचितचे 8 उमेदवार जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी कडून आपल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी वाट पाहून थकलेल्या प्रकाश आंबेडकरांनी अखेर महाविकास आघाडीचा नाद सोडून देत मनोज जरांगे आणि प्रकाश शेंडगे यांच्याशी सूत जुळवत तिसरी आघाडी स्थापन केली इतकेच नाही, तर त्याचे ८ उमेदवार देखील जाहीर केले. यात त्यांच्या स्वतःचाही समावेश आहे. Prakash Ambedkar not association with Mahavikas Aghadi

    प्रकाश आंबडेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेकरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीला धडा शिकवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

    प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? 

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झाले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला. मुस्लिम, जैन समाजालाही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

    वंचितची पहिली उमेदवार यादी 

    अकोला : प्रकाश आंबेडकर

    भंडारा-गोंदिया : संजय केवट

    गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी

    चंद्रपूर : राजेश बेले

    बुलडाणा : वसंतराव मगर

    अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान

    वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके

    यवतमाळ – वाशिम : खेमसिंग पवार

    Prakash Ambedkar not association with Mahavikas Aghadi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील