विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी कडून आपल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी वाट पाहून थकलेल्या प्रकाश आंबेडकरांनी अखेर महाविकास आघाडीचा नाद सोडून देत मनोज जरांगे आणि प्रकाश शेंडगे यांच्याशी सूत जुळवत तिसरी आघाडी स्थापन केली इतकेच नाही, तर त्याचे ८ उमेदवार देखील जाहीर केले. यात त्यांच्या स्वतःचाही समावेश आहे. Prakash Ambedkar not association with Mahavikas Aghadi
प्रकाश आंबडेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेकरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीला धडा शिकवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झाले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला. मुस्लिम, जैन समाजालाही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
वंचितची पहिली उमेदवार यादी
अकोला : प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ – वाशिम : खेमसिंग पवार
Prakash Ambedkar not association with Mahavikas Aghadi
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी संदेशखळी पीडितेला केला फोन, भाजपने बशीरहाटमधून दिली उमेदवारी
- कट्टर खालिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू खासदार रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल!!
- पूर्व आणि दक्षिणेतल्या राज्यांमधून खासदार संख्या वाढविण्याची भाजपला खात्री; पवार – ठाकरेंची फक्त महाराष्ट्रात 48 जागांमध्ये खेचाखेची!!
- पाकिस्तानच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; 4 दहशतवादी ठार, एक जवान शहीद; बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी