विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगेंनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे असल्याचा हट्ट धरला आहे. पण कुणबी मराठा हे खरे ओबीसी नव्हेत. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीतून ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. कुणबी हे स्वतःला ओबीसी समजत असले तरीही विधिमंडळाच्या सभागृहात मी मराठ्यांसह आहे असं आमदार सांगतो. याचाच अर्थ तो आमदार धनगरांबरोबर, माळी समाजाबरोबर, वंजारी, लिंगायत, बंजारा या समाजाबरोबर नाही, तसंच तो तेली, तांबोळी, लोहार, सोनार यांच्याबरोबर तर अजिबात नाही, हे समजावून घ्या.
ओबीसी आरक्षणाला 100 % धोका
मी तुम्हाला जे सांगतो आहे ते लक्षात घ्या. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 % आहे. निवडणूक झाल्यानंतर हा धोका निर्माण होईल हे विसरु नका. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधीमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार आहेत, तर ओबीसी आमदार हे फक्त 11 आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100 % धोका आहे.
पवार आगीत तेल ओतताहेत
मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद लावण्याचं काम राजकीय पक्ष करत आहेत. शरद पवारांचं स्टेटमेंट आलं महाराष्ट्राचा मणिपूर करु नका. त्यांचं हे वक्तव्य आगीत तेल ओतणारे आहे. उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा आणि जागा वाढवून घ्या त्यानंतर मराठ्यांना ओबीसीत घेऊ आणि आरक्षणाकडे नेऊ. हे बोलणं चिथावणी देणारं आहे. अशी अनेक वक्तव्यं येत आहेत, ज्यातून चिथावणी मिळते आहे. मात्र जनतेचं कौतुक करेन की राजकीय मतभेदांमध्ये जनता पडत नाही.
Prakash Ambedkar Kunbi maratha are not true OBC
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : “वर्षा”वरची अदानींची अंदर की बात एका ओळीची; प्रत्यक्षात पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट साखर कारखानदारांसाठी!!
- Manoj Jarange 288 लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंकडे सध्या प्रत्यक्षात आलेत 63 इच्छुक!!
- ISRO Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रमुख अंतराळवीर म्हणून निवड; एकूण 4 गगनयात्री जाणार अवकाशात
- Central government : केंद्र सरकारची धडक कारवाई, BSF प्रमुख आणि उपप्रमुखांना हटवले, दोघांनाही होम कॅडरला पाठवणार