विशेष प्रतिनिधी
परभणी : महाराष्ट्रात गाड्या फोडाफोडी आणि शाब्दिक बाणसोडी राजकारण सुरू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यात उडी घेतली. अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता??, हिंमत असेल तर, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या गाड्या फोडा ना!!, असे आव्हान आणि चिथावणी प्रकाश आंबेडकर यांनी दिली. Prakash Ambedkar Challenge or provocation??
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आले. गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुनज विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय?? शरद पवार, देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या गाड्या फोडा!! असे आव्हेन प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत. परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. प्रकश आंबेडकर म्हणाले, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय??, गाड्याच फोडायच्या तर तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या गाड्या फोडा ना!!
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आणि अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आव्हान आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील, तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
prakash ambedkar Challenge or provocation??
महत्वाच्या बातम्या
- बीजेडी नेत्या ममता मोहंता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Ashwini Vaishnav :’आम्ही रील बनवणारे नाही, काम करणारी माणसं आहोत’ ; रेल्वेमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं!
- खाशाबा जाधवांनंतर स्वप्नीलने महाराष्ट्राला मिळवून दिले ऑलिंपिक पदक; शिंदे – फडणवीस सरकारचे 1 कोटींचे बक्षीस जाहीर!!
- Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची विम्याच्या हप्त्यावरून जीएसटी हटवण्याची मागणी; अर्थमंत्री सीतारामन यांना लिहिले पत्र