विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : कुणबी-मराठा हे खरे ओबीसी नाहीत. कुणबी मराठ्यांपासून सावध राहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar )यांनी केले आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. सध्या राज्यभरात त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सातत्याने याबाबत भाष्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्यांनी नुकतेच केलेल्या या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे.Prakash Ambedkar
एकही आमदार ओबीसी समाजाच्या बाजूने नाही
यावेळी आंबेडकर म्हणाले, विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार आहेत. त्यापैकी केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका आहे. ओबीसी समाजाच्या बाजूने बोलताना एकही आमदार दिसत नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची भीती आहे”, असे विधान त्यांनी राज्यात ओबीसी- मराठा वाद पेटलेला असताना केले आहे.
कुणबी मराठा आमदार धनगर, माळ्यांसोबत नाही
यावेळीच बोलतांना पुढे आंबेडकर म्हणाले, कुणबी मराठ्यांपासून सावध राहा.कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
निवडणुकीनंतर धोका निर्माण होईल
तसेच पुढे ते म्हणाले, म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल. माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे. ही जनगणना झाली पाहिजे,” अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Prakash Ambedkar
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : ट्रान्सजेंडर-सेक्स वर्कर्स रक्तदान प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस; रक्तदानावर बंदी हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन
- Devendra Fadnavis : चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळातच आला; देशमुखांच्या दाव्यातली फडणवीसांनी काढली हवा!!
- Wayanad Landslides : वायनाड भूस्खलन- मृतांची संख्या 365 वर, 206 बेपत्ता; उद्ध्वस्त घरांमधून चोरी; मुख्यमंत्री म्हणाले- पुनर्वसनासाठी टाऊनशिप
- Samajwadi party : अयोध्येतले बलात्कार प्रकरण समाजवादी पार्टीच्या अंगलट; आधी झाकण्याचा डाव; पण आता न्यायाची मागणी!!