• Download App
    Suresh Dhas तर प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे जावे,

    Suresh Dhas: तर प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे जावे, सुरेश धस यांचे आव्हान

    Prajakta Mali

    विशेष प्रतिनिधी

    बीड :Suresh Dhas कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकही शब्द मी बोललेलो नाही. जर त्यात त्यांना काही अवमानकारक वाटलं, तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं. प्राजक्ताताईंनी ठरवलं तर माझी काही अडचण नाही, असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी दिले आहे.Prajakta Mali

    सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करतानाच प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली आहेत. अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.



    विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते”, असं विधान धस यांनी केले होते. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे, असे ते म्हणाले होते. या प्रकरणात नाव येत असल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    यासंदर्भात सुरेश धस म्हणाले,

    मी रश्मिका मंदाना, प्राजक्ताताई, सपना चौधरी यांची फक्त नावं घेतली. का घेतली? आता मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आणि तुम्ही कृषीमंत्री असून तिकडे रश्मिका मंदानांचा कार्यक्रम घेता? तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे? त्यावर टीका झाली. राजू शेट्टीही इथे येऊन गेले. त्यांनीही टीका केली. धनंजय मुंडेंना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही.

    सुरेश धसांविरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सुरेश धस यांनी भूमिका मांडली आहे. “कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकही शब्द मी बोललेलो नाही. त्यांनी माझी प्रतिक्रिया पुन्हा एकदा बघावी. जर त्यात त्यांना काही अवमानकारक वाटलं, तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यानंतरही प्राजक्ताताईंनी ठरवलं तर माझी काही अडचण नाही. मी त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम आवडीने पाहात असतो. मनात असं असतं की एक चांगली मराठी मुलगी प्रगती करतेय, बरं वाटतं. त्यांनी जर तक्रार केली, तर मी त्याला सामोरा जाईन. मला काहीच अडचण नाही. मी तर त्यांचा उल्लेख ‘प्राजक्ता ताई’ असा केला आहे.

    Prajakta Mali should go to the Women’s Commission, Suresh Dhas’s challenge

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस