नाशिक : दादा – ताईंच्या ऐक्यात प्रफुल्ल पटेलांची पाचर; केंद्रातल्या सत्तेच्या खुर्चीसाठी “पवार संस्कारितांची” तडफड!!, हेच राजकीय वास्तव चित्र प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाखतीतून समोर आले. Prafulla Patel
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी अजित पवार यांच्याबरोबर सुप्रिया सुळे देखील स्टेजवर होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका मधले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. त्यामुळे पवार काका – पुतण्यांच्या राजकीय एकीची चर्चा सुरू झाली. पवारांची राष्ट्रवादी लवकरच अजित पवारांचा राष्ट्रवादीत विलीन होईल आणि अजित पवारांकडे सगळ्या पक्षाचे नेतृत्व येईल. या ऐक्याच्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी भाकीते अनेक मराठी माध्यमांनी केली. त्यामुळे राज्यात दादा – ताईंच्या ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.
– इतर नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात
पण दादा आणि ताईंच्या ऐक्यामुळे इतर नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले. या धोक्यात आलेल्या नेत्यांपैकी प्रफुल्ल पटेल एक महत्त्वाचे नेते ठरले. म्हणूनच त्यांनी एनडीटीव्ही मराठीच्या “पॉवर प्ले” कार्यक्रमात मुलाखत देताना दादा आणि ताई यांचे ऐक्य हाणून पाडले.
– मंत्रिपदाचा पत्ता कट होण्याची पटेलांना भीती
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे ऐक्य झाले आणि त्यानंतर एकीकृत राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवारांकडे आले, तर त्याचे पडसाद केंद्राच्या राजकारणात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्री पद मिळाले, तर आपला पत्ता कट होईल, याची भीती प्रफुल्ल पटेल यांना वाटली. त्यामुळेच त्यांनी दादा आणि ताई यांच्या राजकीय ऐक्याची कुठलीही शक्यता नाही, असे त्या मुलाखतीत सांगून टाकले. यासाठी त्यांनी भली मोठी कारणे सुद्धा दिली.
आज शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही राजकारण वेगळे झाले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारांमध्ये आहोत. शरद पवारांनी वेगळा विचार केला. सुरुवातीला ते आमच्याबरोबरच येणार होते, पण नंतर त्यांनी विचार बदलला त्यामुळे आज हीच वस्तुस्थिती आहे, की त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे. येत्या काळात तरी लगेच बदल होण्याची शक्यता नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल यांनी या या मुलाखतीतून त्यांनी दादा आणि ताई यांच्या ऐक्यामध्ये पाचर मारली आणि स्वतःचे केंद्रातल्या राजकारणातले स्थान टिकवून ठेवण्याचा डाव खेळला. त्यापलीकडे दुसरे काही घडले नाही.
Prafulla Patel dents Ajit Pawar – Supriya sule unity
महत्वाच्या बातम्या
- महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची हाराकिरी; पण भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस लै भारी!!
- पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांची “गेम”; महापालिकेला अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन!!
- David Eby : भारत-कॅनडा संबंध सुधारल्याने खालिस्तान समर्थक चिडले; बीसी प्रीमियर डेवी एबी यांच्या दौऱ्यामुळे संतप्त
- Canada : कॅनडा सरकारचा पंजाबी लोकांना मोठा धक्का; ज्येष्ठांच्या पीआरवर 2028 पर्यंत बंदी; केअरगिव्हर कार्यक्रमही थांबवला