नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनेत्रा पवारांची निवड झाली त्याचवेळी प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षपदी कायम राहिले. त्यामुळे विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून अधिक बळकट झाला. ही अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईतल्या वरळी डोम मध्ये घडली. Praful Patel
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड झाली. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मांडलेल्या सुनेत्रा पवारांच्या नावाच्या प्रस्तावाला पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाने हात वर करून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले. सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी विनम्रपणे स्वीकारली.
– छगन भुजबळांचा प्रस्ताव
त्यानंतर छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणात त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर कायम राहावे, असा सूचनावजा प्रस्ताव मांडला. त्यांच्या सूचनेला हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबरोबरच प्रफुल्ल पटेल यांच्या कार्याध्यक्षपदावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शिक्कामोर्तब केले.
पण या मोठ्या घडामोडीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या विलीनीकरण विरोधातला गट बळकट झाल्याचे स्पष्ट झाले.
– विलीनीकरणातून पवारांचेच नेते लाभार्थी
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा धोषा लावला होता. त्यांना एक तर भाजपच्या सत्तेतला वाटा हवा होता त्याचबरोबर अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच एक करून तिच्यावर ताबा मिळवायचा होता. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे आणि महत्त्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे हे सगळे नेते मोठे लाभार्थी ठरणार होते.
– विलीनीकरणाचा डाव पाडला हाणून
पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेचा डाव हाणून पाडला. सुनेत्रा पवार यांनी ताबडतोब उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अजित पवारांचा राजकीय वारसा स्वतःच्या खांद्यावर घेतला. पार्थ पवार ची राजकीय व्यवस्था लावली. या दरम्यानच्या काळात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी राजकीय संबंध प्रस्थापित केले. आपल्या सर्व राजकीय हालचालींसाठी भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांची अधिमान्यता मिळवली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर आपोआपच शिक्कामोर्तब झाले.
– प्रफुल्ल पटेलांची निवड
पण आज त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांनी अतिशय काळजी घेऊन प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदावरची निवड कायम ठेवली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात कायमची पाचर मारली गेली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि बाकीच्या नेत्यांवर शरसंधान साधले होते. त्यांच्यावर दात धरला होता. सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांना वगळून बाकीच्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोष दिला होता.
– विलीनीकरण विरोधातला खुंटा हलवून बळकट
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही प्रवृत्ती पाहून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि बाकीचे नेते अधिक आक्रमक राहिले ते फारसे काही बोलले नाहीत पण त्यांनी ठामपणे राजकीय कृती करणे सोडले नाही. त्यांनी पक्षांतर्गत एकजूट टिकवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार आपल्या बाजूलाच टिकवून ठेवले. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची सातत्याने संपर्क ठेवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आपल्या पक्षात घुसखोरी करण्यासाठी कुठलीही फट शिल्लक ठेवली नाही. त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडी बरोबरच प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर फेरनिवड केली. त्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला विलीनीकरण विरोधी गटाचा खुंटा हलवून बळकट केला.
– प्रफुल्ल पटेल यांची साथ आवश्यक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सुनेत्रा पवारांची निवड झाली असली, तरी विद्यमान राजकीय परिस्थितीत त्या एकट्या कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाहीत. कुठल्याही निर्णयात त्यांना प्रफुल्ल पटेल यांची साथ घ्यावी लागेल. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर तर प्रफुल्ल पटेल यांच्या मताशिवाय सुनेत्रा पवार यांना पुढे जाता येणार नाही.
Praful Patel made executive president of NCP
महत्वाच्या बातम्या
- AI मुळे जागतिक बाजारपेठेत मोठे बदल; कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र घडवायचा संकल्प
- Lok Sabha : लोकसभेने 64 पार्लियामेंट्री फ्रेंडशिप ग्रुप्स तयार केले, प्रत्येक गटामध्ये एक नेता आणि 11 खासदार
- Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- डिजिटल अरेस्ट हा 100 टक्के फ्रॉडच, बळी पडू नका, थेट परदेशातून हलतात सूत्रे
- बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तर शरद पवार दाखल करणार अर्ज??; पराभवाच्या भीतीने घेणार निर्णय??