• Download App
    Rohit Pawar प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??

    प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??

    नाशिक : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.

    कारण रोहित पवारांनी ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नव्याने निशाणा साधताना जी कागदपत्रे सादर केली किंवा जे दावे केले, ते पाहता रोहित पवारांना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांच्याविरुद्ध प्रचंड मोठी वातावरण निर्मिती करायची आहे. त्याच वेळी सुनेत्रा पवार यांची सत्तेवरची मांड पक्की करायची आहे आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या संघटनांवर पवारांची निसटती पकड घट्ट करायची आहे हे स्पष्ट होते.

    रोहित पवारांचा वेगळाच “डाव”

    त्या पलीकडे जाऊन रोहित पवारांनी मराठी माध्यमांद्वारे जी वातावरण निर्मिती केली, त्यातून ही बाब तर उघड्यावरच आली, ती म्हणजे रोहित पवारांना केवळ अजितदादांच्या पक्षांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करायची नसून खुद्द शरद पवारांचा पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. कारण शरद पवारांनी आपला वारस म्हणून सुप्रिया सुळे यांना निवडले असले, तरी त्या महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवण्यात यशस्वी झाल्या नसल्याने शरद पवारांच्या नंतर त्यांची जागा किंबहुना ते असतानाच त्यांची कार्यकारी जागा आपल्या ताब्यात यावी, यासाठी रोहित पवारांची जोरदार धडपड सुरू आहे आणि या धडपडीचा एक भाग म्हणूनच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर शरसंधान साधताना दिसत आहेत.



    – “रोहित पवार प्रयोग”

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, तो शपथविधी शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना आणि रोहित पवारांना मोठा राजकीय फटका देऊन गेला. कारण सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदामुळे सुप्रिया सुळे यांच्याच राजकीय महत्त्वाकांक्षेचे पंख छाटले गेले. रोहित पवारांच्या हातातोंडाशी आलेले महाराष्ट्रातले राज्यमंत्रीपद निसटून गेले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना सत्तेची कुठलीही फळे किंवा त्या फळांची फोड सुद्धा चाखायला मिळाली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या सकट सगळ्याच त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या मनाचा जळफळाट झाला. पण हा जळफळाट थेट सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्यावर काढता येत नसल्यामुळे रोहित पवारांच्या तोंडातून तो प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर काढला गेला. स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या दोन्ही नेत्यांनी स्वतःला या सगळ्यांपासून अलिप्त ठेवले. कारण केवळ जळफळाट करून आपल्याला हव्या गोष्टी साध्य करता येणार नाहीत, हे त्यांना कळून चुकले. अशा स्थितीत गप्प राहून देखील चालणार नव्हते म्हणून मग त्यांनी “रोहित पवार प्रयोग” सुरू करून दिला.

    – पक्षाचा कब्जा रोहित पवारांकडे??

    पण हा रोहित पवार प्रयोग मुंबईपासून दिल्लीपर्यंत एवढा चालला, की सुप्रिया सुळे यांना बाजूला सारून रोहित पवारच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पूर्ण कब्जा आपल्या ताब्यात घेतात की काय अशी वेळ येऊन ठेपली. कारण रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताविषयी घातपाताची पेरणी अशी काही करून ठेवली, की त्या पेरणीचे पीक रोहित पवारांच्या भोवतीच जोमाने वाढले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जणू काही एकटेच रोहित पवार हे आक्रमक नेते उरलेत आणि रोहित पवारच शरद पवारांचे पुढचे वारस ठरलेत, पवारांचे राजकारण रोहित पवारच पुढे चालवू शकतात, असे भासमान व्हायला लागले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी रोहित पवारांचे नेतृत्व निदान किमान माध्यमांमध्ये तरी एकमुखाने समोर आले. त्यामुळे रोहित पवार म्हणतात, त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोन नेते अजित पवारांच्या पक्षाच्या ताबा घेतील की नाही, हा भाग अलहिदा, पण त्या ऐवजी रोहित पवारच शरद पवार यांच्या पक्षाचा पूर्ण ताबा घेऊ लागलेत, हीच बाब या निमित्ताने समोर आली.

    Praful Patel and Sunil Tatkare wanted to take control of Ajit Dada’s party. : Rohit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    35 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळायची अफवा; सरकारचा स्पष्ट शब्दांत खुलासा!!

    Dada Bhuse : RTE विद्यार्थ्यांकडून शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये ; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची स्पष्ट भूमिका

    अहिंसेच्याच्या नावाखाली काँग्रेसने हिंदूंना दुबळे आणि घाबरट बनविले; हिंदू संमेलनात शरद पोंक्षेंचे टीकास्त्र