वृत्तसंस्था
पुणे : कोंबड्या अंडी देत नाहीत, अशी अजब तक्रार चक्क पोल्ट्री चालकांनी पोलिस ठाण्यात केली. त्यामुळे पोलिसांना धक्का बसला असून ते चक्रावून गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अशी तक्रार दिली आहे.Poultry drivers who do not lay hen eggs Complaint; Loni Kalbhor’s police chakravale
लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी आठ दिवसापासून अंडी देणं बंद केले आहे. यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पोल्ट्री चालकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. ती बघून पोलिसही चक्रावले आहेत.
नेमका प्रकार काय ?
लोणी काळभोरचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, ”म्हातोबाची आळंदीतील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी ११ एप्रिल रोजी एका कंपनीचे खाद्य कोंबड्याना घातलं होतं. ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांच अंडी देणंच बंद झालं.
यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्या खाद्यामुळे कोंबड्यानी अंडी देणं बंद केल्याचे प्राथमिक तपासात दिसते आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. संपूर्ण चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल,” अशी माहिती देण्यात आली.
Poultry drivers who do not lay hen eggs Complaint; Loni Kalbhor’s police chakravale