विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काही ठिकाणी पाठिंबा, पण त्याच वेळी आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांवर मात्र अविश्वास अशी दुहेरी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. यातूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत एकत्र येतील, असा खळबळजनक दावा केला. Post Election Thackeray – Shinde Together With Modi; New claim of Prakash Ambedkar
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत समझोता केलाय. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणारा आहे का??, असा सवालही आंबेडकरांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे – शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले, तर मी त्यांना मदत करणार. त्यामुळे हे फसवाफसवीचे राजकारण सुरू आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होते
शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे, वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीतील लढतीत कोण बाजी मारणार??, याकडे सर्वांचच लक्ष लागलंय. लोखंडे म्हणतात, वाकचौरे खुडुक कोंबडी, तर वाकचौरे म्हणतात मी अंडे देणारी कोंबडी. मात्र वंचितच्या रूपवतेंनी कोंबडी असो की अंडे ते आम्ही प्रेशर कुकरमध्येच शिजवणार, असं म्हणत विरोधकांना आपल्या विजयाचा दावा बोलून दाखवला.
Post Election Thackeray – Shinde Together With Modi; New claim of Prakash Ambedkar
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!