• Download App
    औरंगाबाद, जळगाव, नाशिकमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; अवकाळीने शेतकरी धास्तावलेPossibility of torrential rains in Aurangabad, Jalgaon, Nashik; The farmers were terrified by the untimely arrival

    औरंगाबाद, जळगाव, नाशिकमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; अवकाळीने शेतकरी धास्तावले

    वृत्तसंस्था

    जळगाव : रब्बी हंगामातील गहु, तूर, हरभरा या पिकांची काढणी सुरू असताना व राज्यातील बहुतांश भागात आब्यांला मोहोर आलेला असतानाच हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी ७ मार्च रोजी औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. Possibility of torrential rains in Aurangabad, Jalgaon, Nashik; The farmers were terrified by the untimely arrival

    रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेला असताना व अनेक भागांत पिकांची काढणी झालेली नसल्याने या पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा धास्तावला आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

    हवामान विभागाने मंगळवारी व बुधवारीदेखील जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय पालघर, पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, या भागांत तुरळक पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत हे क्षेत्र तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

    रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती

    मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांसह कोकणातही पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उसदेखील कारखान्यांनी अद्याप तोडलेला नाही. त्यातच आता या अवकाळी पावसामुळे हा ऊसदेखील पाण्यात जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

    Possibility of torrential rains in Aurangabad, Jalgaon, Nashik; The farmers were terrified by the untimely arrival

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!