• Download App
    आजपासून एसटी संप चिघळण्याची शक्यता ; युनियनचे सरचिटणीस शशांक राव आज पासून उपोषणाला बसणार । Possibility of ST strike from today; Union general secretary Shashank Rao will go on a hunger strike from today

    आजपासून एसटी संप चिघळण्याची शक्यता ; युनियनचे सरचिटणीस शशांक राव आज पासून उपोषणाला बसणार

    • दरम्यान, रविवारी १,१०८ बस रस्त्यावर धावल्या असून १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा महामंडळाने केला आहे. Possibility of ST strike from today; Union general secretary Shashank Rao will go on a hunger strike from today

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मागील दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला असला तरी कर्मचारी विलिनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने काढलेल्या तोडग्यावर कर्मचारी नाराज असल्याचं पाहायला मिळतंय.

    राज्यात काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत काम सुरू केलं असलं तरी, एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव हे आज पासून उपोषणाला बसणार असल्याने संप पुन्हा एकदा चिघळणार असल्यची शक्यता आहे.



    दरम्यान, रविवारी १,१०८ बस रस्त्यावर धावल्या असून १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा महामंडळाने केला आहे. दरम्यान, कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू असून रविवारी ९३ कर्मचारी निलंबित, तर २९ रोजंदार गटातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता ६,४९७; तर सेवा समाप्त कर्मचाऱ्यांची संख्या १,५२५ वर पोहचली आहे.

    Possibility of ST strike from today; Union general secretary Shashank Rao will go on a hunger strike from today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!