विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईत कोविडचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात चाचण्या आणि आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक टक्यां वर आले आहे. त्या मुळे आता कोविडचा पॉझिटीव्हीटी दर एक टक्यांण वर आला आहे. फेब्रुवारीत कोविडची दुसरी लाट आल्यािनंतर मध्यावर पॉझिटीव्हीटी दर हा १६.१४ टक्के होता; तर मे २०२० मध्ये सर्वाधिक २७. ६९ टक्के होता.Positivity rate in maumbai lowest in this year
मुंबईत कोविडच्या् पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च २०२० मध्ये झाली. सुरुवातीला कोविडची बाधा फक्त परदेशातून आलेल्यांना झाल्यागचे आढळत होते. त्या नंतर उच्च वसाहतींमध्येही कोविडची बाधा होऊ लागली. मे महिन्यात झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळू लागले होते. त्या् वेळी कोविडचा पॉझिटीव्हीटी दर २७.६९ टक्यां्ण वर पोहचला होता. म्हणजे १०० कोविड चाचण्या झाल्यानंतर त्यात २७.६९ टक्के बाधित आढळत होते.
दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजारपर्यंत रुग्णांची नोंद होत होती. सध्या १०० संशयितांची चाचणी झाल्यावर अवघा एक रुग्ण आढळत आहे; तर दिवसातील रुग्णांचे प्रमाणही २०० ते ३०० मध्ये आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून दररोज सरासरी ३२ ते ३३ हजार चाचण्या होत असल्याहची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्या०त आली आहे. कोणत्याही आजारात मृत्युदर कमी असणे आवश्यक आहे.
पहिल्या लाटेत मार्च महिन्यात मृत्युदर १२.०४ टक्के होता. म्हणजे १०० रुग्णांपैकी १२ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. मे २०२१ मध्ये कोविडच्यार दुसऱ्या लाटेवळी मृत्युदर नियंत्रणात होता. त्याृ वेळी मृत्युदर २.५ टक्के होता. आता हा मृत्युदर २.१ टक्यांया पर्यंत आला आहे. मृत्युदर एक टक्क्याहून खाली आणण्याचे आव्हान आहे.
Positivity rate in mumbai lowest in this year
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकार काळ्या बुरशीने ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देणार
- स्फोटक अफगणिस्तानमधून ४०० भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका, भारताच्या भूमीत आल्याचा आनंद
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची युवकाला आस; श्रीनगर ते दिल्ली असा ८५० किलोमीटरचा करणार चालत प्रवास
- नोकरी गमावलेल्यांना लाखो कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, सरकार २०२२ पर्यंतचा ‘पीएफ’ भरणार
- गुजरातमधील १६ वर्षाच्या मुलाला चक्क कला क्षेत्रात मानद डॉक्टरेट; शामक अग्रवाल बनला सुरतचा सर्वात तरुण डॉक्टरेट