• Download App
    देशात लोकसंख्येचे असंतुलन परवडणारे नाही, राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण सर्वांसाठी समानच हवे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत । Population policy should be considered once again, the policy should be made for the next 50 years, and it should be implemented equally, population imbalance has become a problem: RSS chief Mohan Bhagwat

    देशात लोकसंख्येचे असंतुलन परवडणारे नाही, राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण सर्वांसाठी समानच हवे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : देशात निर्माण झालेले लोकसंख्येचे असंतुलन परवडणारे नाही. त्यामुळे देशाचे लोकसंख्या नियंत्रण धोरण पुढच्या ५० वर्षांचा भविष्यकाळ नजरेसमोर ठेवून तयार केले पाहिजे, असे निःसंदिग्ध प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ड़ॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. Population policy should be considered once again, the policy should be made for the next 50 years, and it should be implemented equally, population imbalance has become a problem: RSS chief Mohan Bhagwat

    विजयादशमीच्या मुहूर्तावर संघाचे पारंपरिक शास्त्र पूजन सरसंघचालकांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मोहन भागवत यांनी स्वतंत्र अखंड भारताची विस्तृत संकल्पना मांडली. देशाच्या सर्व क्षेत्रातील धोरणांची चिकित्सा केली. यामध्ये त्यांनी देशाच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर भाष्य केले. ते म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर १९५१ ते २०११ या कालखंडात या देशात निर्माण झालेल्या धर्म मते मानणाऱ्यांची लोकसंख्या ८८ टक्क्यांवरून घटली आणि ती ८३.८ टक्के झाली, तर मुस्लीमांची लोकसंख्या ९.८ टक्क्यांवरून वाढून ती १४.२३ टक्के झाली आहे, याकडे डॉ. मोहन भागवत यांनी लक्ष वेधले.

    देशातल्या अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरण कायदे विधिमंडळांमध्ये मंजूर केले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात या कायद्याबाबत चर्चा सुरू असताना डॉ. मोहन भागवत यांनी या विषयावर सविस्तर भाष्य करणे याला राजनैतिक पातळीवर विशेष महत्त्व आहे.

    देशात तयार झालेले हे लोकसंख्येचे असंतुलन देशाला परवडणारे नाही. त्यामुळे पुढील ५० वर्षांचा भविष्यकाळ नजरेसमोर ठेवूनच राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण ठरविले पाहिजे आणि ते सर्वांसाठी समान असले पाहिजे, अशी आग्रही सूचना डॉ. मोहन भागवत यांनी केली.

    आपल्या सर्व भारतीयांचे पूर्वज एक आहेत. आपण विविधतेत एकता मानतो. या देशात हसनखान मेवाती, हकीमखान सुरी, खुदाबक्ष, गौस खान आणि अशफाकुल्ला खान यांच्या सारखे क्रांतिकारक झाले. त्यांचा त्याग, धैर्य अतुलनीय आणि सर्वांसाठी अनुकरणीय आहे. केवळ पूजा पध्दतीमध्ये फरक असल्याने देशाच्या एकात्मतेत बाधा येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    Population policy should be considered once again, the policy should be made for the next 50 years, and it should be implemented equally, population imbalance has become a problem: RSS chief Mohan Bhagwat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस