- महाराष्ट्रातील ‘या’ बड्या लोकप्रिय नेत्याची कार्यक्रमाच्या पहिल्याचं भागात असणार हजेरी..
विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रसिद्ध मराठमोळा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांची दहा वर्षांपूर्वी एक नवी ओळख मराठी प्रेक्षकांना झाली होती. ती ‘खूपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात. गायक म्हणून परिचित असणारे अवधूत गुप्ते या पर्वा मधून लोकप्रिय मुलाखतकार म्हणून प्रसिद्धी झाले. Popular show Khoopate Tithe Gupte returns after 10 years
अवधूतच्या दिलखुलास, मनमोकळी आणि खुमासदारपणे पाहुण्यांच्या मनातली खदखद बाहेर काढण्याच्या शैलीने या कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली होती.. आधीच्या पर्वात अनेक ज्येष्ठ अभिनेते, राजकारणी, समाजातील प्रतिष्ठित मान्यवर लोक सहभागी झाले होते.
झी मराठीच्या इतिहासातलं ते यशस्वी पर्व ठरलं होतं –
आता तब्बल दहा वर्षांनी या कार्यक्रमाचे दुसरे पर्व येऊ घातलंय.. ४ जून रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. त्याची झलक नुकतीच झी मराठीवर पाहायला मिळाली. यामध्ये एक महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे आणि लोकप्रिय नेते पहिल्या भागात सहभागी होणार आहेत.. त्यांच्या पेहरावावरून ते नेते कोण याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. पायात चामड्याची मोजडी अंगात खादीचा उंची कुर्ता, चालण्या बोलण्यातला रुबाब आणि भेदक नजर असणारे खूपते तिथे गुप्ते कार्यक्रमाच्या पहिल्या भागात हजेरी लावणारे लोकप्रिय नेते दुसरे-तिसरे कोणी नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आहेत.
आता राज ठाकरेना नेमकं काय खुपतं? आणि ते खुपणं ते कशाप्रकारे आपल्या शैलीमध्ये या कार्यक्रमांमध्ये मांडतात आणि आपल्या बोलण्यातून किती षटकार त्या मुलाखतीत लगावतातं याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. तसेच अवधूत गुप्ते देखील आपल्या गोड बोलण्यातून योग्य ठिकाणी चिमटा काढून. पाहुण्यांना बोलत करण्यात हुशार आहेत.त्यामुळे दोन्ही बाजूने सेम बॅटिंग होणार असल्याने या मुलाखतीचा कलगीतुरा कसा रंगतोय हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
Popular show Khoopate Tithe Gupte returns after 10 years
महत्वाच्या बातम्या
- अदानी-हिंडेनबर्ग वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला
- द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर
- एलन मस्क सोडणार ट्विटरचे सीईओ पद, 6 आठवड्यांत महिला सीईओ करणार जॉइन
- पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, 4400 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी