विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्या मतदारसंघातील मतदारांनी भले 31.74 % एवढे अल्प मतदान केले असेल, पण त्यांनी आमदार जरूर निवडला. पण त्यांनी एक नगरसेवक “नाकारला” आहे. Political Weaponization of NOTA experiment dangerous to political parties and democracy
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 66530 मते मिळाली. पण या निवडणुकीतून मतदारांनी दिलेला एक वेगळा संदेश आहे, तो म्हणजे नोटाला (मतदान यंत्रावर दिलेल्या उमेदवारांपैकी कोणीही नाही.) या पक्षाला दिलेल्या मतांची आकडेवारी पाहिली, तर अंधेरीतल्या मतदारांनी एक नगरसेवकाला मिळतील एवढी मते नकारात्मक टाकली आहेत. याचा अर्थ अंधेरीतल्या मतदारांनी एक नगरसेवक “नाकारला” आहे. अंधेरीत नोटाला 12806 एवढी मते मिळाली आहेत.
या निकालाचा नीट अर्थ समजावून घेतला पाहिजे. कारण अंधेरीच्या विजयामुळे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पक्षात नव्याने चैतन्य आल्यामुळे भाजपवर तोफांचा भडीमार जोमाने सुरू झाला आहे. पेटली मशाल विजय विशाल वगैरे घोषणाही सुरू आहेत.
- महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची
पण विश्लेषकांनी या निवडणुकीचे जे विश्लेषण केले आहे, त्यामध्ये एक गंभीर इशारा दडला आहे आणि तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी जास्त महत्त्वाचा आहे. कारण अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालावरून शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकू शकेल, असा निष्कर्ष विश्लेषकांनी काढला आहे. या निष्कर्षाला त्यांनी मुस्लिम मतांचा पाठिंबा शिवसेनेला वाढता असल्याचे कारण देखील दिले आहे. हे कारण खरे मानले आणि विश्लेषकांचा निष्कर्ष ही खरा मानला तर नेमका त्यामध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गंभीर इशारा आहे आणि तोच इशारा नोटांच्या मतदान संख्येतून दिसतो आहे. अंधेरीची पोटनिवडणूक शिवसेनेसाठी जशी प्रतिष्ठेची होती, तेवढीच प्रतिष्ठेची किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रतिष्ठेची निवडणूक मुंबई महापालिकेची आहे.
- नोटा प्रयोग धोक्याचा
या पार्श्वभूमीवर नोटाला झालेले 12806 हे मतदान किती गंभीर आहे हे लक्षात येते. 12806 एवढे मतदान एका नगरसेवकाचे मतदान असते. ते एक नगरसेवक निवडून आणू शकते तसेच ते नगरसेवक पाडू शकते. अंधेरीतला हा नोटा प्रयोग मुंबई सह बाकीच्या महापालिका निवडणुकीमध्ये झाला आणि तो विस्तारला तर आश्चर्य वाटायला नको. कारण राजकीय पक्षांच्या हातात चलनी नोटांचे खेळणे ही किरकोळ बाब आहे. पण मतदान यंत्रावरचे नोटा बटन हे खेळणे राजकीय पक्षांनी खेळायला सुरुवात केली, तर मात्र बऱ्याच राजकीय भूकंपांची शक्यता तयार होते. अंधेरीतल्या नोटा मतांच्या संख्येने हा इशारा देऊन ठेवला आहे.
Political Weaponization of NOTA experiment dangerous to political parties and democracy
महत्वाच्या बातम्या
- T-20 विश्वचषकात भारत सेमीफायनलमध्ये; नेदरलँड विरुद्ध पराभूत दक्षिण आफ्रिका पुन्हा “चोकर”
- मशाल पेटली, अंधेरी जिंकली; पण विजयात मुस्लिम मतांचा वाटा असेल तर…
- महाराष्ट्रात कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू; नोंदणी फक्त १ रुपयात
- महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा
- प्रफुल्ल पटेल विचारतात, राष्ट्रवादी नंबर 1 वर का नाही?; पण पक्षाचे मिशन 100 वरच मर्यादित
- The Kerala Story : 32000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री!!