Friday, 9 May 2025
  • Download App
    भाजपशी लढाईसाठी शेकाप, मनसे, वंचित आघाडी, आरपीआय मधून राष्ट्रवादीचे राजकीय भरणपोषण!!|Political support of NCP from PWD, MNS, deprived front, RPI for fighting BJP

    भाजपशी लढाईसाठी शेकाप, मनसे, वंचित आघाडी, आरपीआय मधून राष्ट्रवादीचे राजकीय भरणपोषण!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात भाजप विरोधातील लढाई तीव्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय भरण-पोषण सुरू आहे. ते भाजपपेक्षा शेतकरी कमगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी या पक्षांमधून सुरू आहे. मूळचे शेतकरी कामगार पक्षाचे पण सध्या भाजपमध्ये असलेले परभणीचे नेते माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.Political support of NCP from PWD, MNS, deprived front, RPI for fighting BJP

    त्यांच्याबरोबर वर्धा, परभणी, पुणे, नांदेड या शहरांमधील वर उल्लेख केलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी ट्विट करून भाजपवर टीका असून भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर कितीही मोठी व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीपुढे मोठ्या व्यक्तीचा करिष्मा टिकत नाही. उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात भाजपमधून मंत्री, आमदार बाहेर पडत आहेत. महाराष्ट्रात देखील लवकरच भाजपमधून अनेक आमगार बाहेर पडतील, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



    ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तोंडी तोफा डागत प्रत्यक्षात पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष फोडून त्या पक्षाचे नेते तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले, आज त्याच पद्धतीने शरद पवार यांनी भाजपला राजकीयदृष्ट्या टार्गेट केले, परंतु प्रत्यक्षात शेतकरी कामगार पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी यांचे पदाधिकारी सामील करून घेतले आहेत.

    वर्ध्यातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुण्याच्या आरपीआयच्या नेत्या श्रद्धा साठे, प्रदीप साठे तसेच नांदेडचे बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पैठणमधील कार्यकर्ते किशोर दसपुते यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

    भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार विजयराव गव्हाणे हे मूळचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते. त्यांचे वडील कै. अण्णासाहेब गव्हाणे हे शेतकरी कामगार पक्षाचे परभणीतून आमदार होते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे परभणीत काँग्रेस पक्ष प्रभावी होता. परंतु, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने त्या जिल्ह्यात आपला मोठा प्रभाव तयार केला होता.

    अण्णासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यावेळी कार्यरत होती, याची आठवण शरद पवार यांनी आपल्या ट्विट मधून करून दिली आहे. भाजप विरोधात लढाई करत असताना प्रत्यक्षात पवारांनी शेकाप, वंचित बहुजन आघाडी, मनसे आरपीआय या पक्षातले नेते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेतले आहेत.

    Political support of NCP from PWD, MNS, deprived front, RPI for fighting BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार