प्रतिनिधी
औरंगाबाद : राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेतील खासदार संभाजीराजे हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामावर समाधानी आहेत. ते महाविकास आघाडी बरोबर येणार आहेत, असा दावा ठाकरे – पवार सरकार मधील सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला. संभाजी राजे हे महाविकास आघाडी सरकार बरोबर येतील, असे उद्गार त्यांनी काँग्रेसच्या स्टेजवर काढले. मात्र त्याबद्दल नंतर खाली पत्रकारांनी प्रश्न विचारताच सारवासारव केली.Political skepticism”: Sambhaji Raje will come with Mahavikas Aghadi; Amit Deshmukh’s exclamation on stage … but only after treatment
त्याचे झाले असे… अमित देशमुख आज औरंगाबाद मध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सहभागी झाले. त्यावेळी भाषण करताना त्यांनी खासदार संभाजीराजे यांचा उल्लेख केला. संभाजीराजे यांनी उपोषण सोडले. मराठा समाजाविषयी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. यापुढे ते महाविकास आघाडी बरोबर काम करणार आहेत, असे त्यांनी आम्हाला सांगितले, असे उद्गार अमित देशमुख यांनी स्टेजवर काढले.
मात्र यासंदर्भात ते खाली आल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावेळी मात्र अमित देशमुख यांनी सारवासारव केली. मराठा समाजाच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. परंतु, मराठा आरक्षणाला मूर्त स्वरूप येण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न करेल. त्या प्रयत्नांसाठी संभाजीराजे हे महाविकास आघाडी बरोबर असतील. एवढ्या संदर्भापुरतेच मी बोललो, असे अमित देशमुख म्हणाले.
मात्र, अमित देशमुख यांच्या काँग्रेसच्या स्टेजवरील विधानामुळे संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाविषयीच्या मागण्यांबद्दल “राजकीय संशयकल्लोळ” तयार झाला आहे. संभाजीराजे नेमके कोणत्या पक्षाबरोबर आहेत?, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. स्वतः संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकीय पक्ष विरहीत असल्याचे अनेकदा सांगितले आहे.
आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार आहोत. त्यामुळे पक्ष वगैरे असे काही नाही, असे ते म्हणाले आहेत. परंतु, आता अमित देशमुख यांनी संभाजीराजे हे महाविकास आघाडी समवेत काम करायला तयार आहेत, असे उद्गार काढल्यानंतर “राजकीय संशयकल्लोळ” सुरू झाला आहे. या “राजकीय संशयकल्लोळाला” खासदार संभाजीराजे हे स्वतः काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Political skepticism”: Sambhaji Raje will come with Mahavikas Aghadi; Amit Deshmukh’s exclamation on stage … but only after treatment
महत्त्वाच्या बातम्या
- INDIAN ARMY : सर्वोच्च बलीदान देणाऱ्या सैनिकांसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करणे चुकीचे
- मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
- इतिहासातील काही तथ्ये मला लोकांनी सांगितली, मी ती तपासून घेईल, समर्थ रामदास वादाबाबत राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका
- छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, पत्नीने माझ्यावर गनिमी कावा करत स्वत;ही उपोषण केले