विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीच्या पाडव्याचा सण देशभरात जुंपलेय काँग्रेस आणि भाजपमध्ये रण, तर बारामतीत चालू आहे काका विरुद्ध पुतण्याची रडारड!!
आई दिवाळीच्या पाडव्याच्या सणाला काँग्रेस आणि भाजपमध्ये विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये ट्विटर युद्ध रंगले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना खिशाला परवडतील एवढीच आश्वासने द्या. कर्नाटक सारखे करू नका, असे खडसावले त्याच्या बातम्या सगळ्या प्रसार माध्यमांनी दिल्या. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसला डिवचायची संधी मिळाली. मोदींनी आता काँग्रेसने त्यांना समजले असेल की आश्वासनाच्या जुमल्याने एखादी निवडणूक जिंकता येते, पण जनतेला कायमचे फसवता येत नाही, असे ट्विट मोदींनी केले त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला भारतीय जुमला पार्टी म्हणून हिणवले. त्यात त्यांनी भाजपला बी म्हणजे बिट्रेयल, जे म्हणजे जुमला असे लेबल चिटकवले.
त्या पाठोपाठ भाजप आणि काँग्रेस मधल्या अनेक नेत्यांनी एकमेकांवर तुटून पडायची संधी साधली. पाडव्याच्या सणाच्या दिवशी संपूर्ण देशभर भाजप आणि काँग्रेसचे नेते सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर तुटून पडले. काँग्रेस मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी अजित पवारांच्या वक्तव्यातून भाजपचे वॉशिंग मशीन उघड्यावर आले, असे भाजपला टोचले. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशवन यांनी काँग्रेसला महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये मोठा पराभव दिसतोय म्हणून त्या पक्षाचे नेते बावचळलेत, अशी टीका केली. काँग्रेस आणि भाजपचे बाकीचे नेतेही एकमेकांवर तुटून पडले.
एकीकडे काँग्रेस आणि भाजप मध्ये देशभर रण माजले असताना बारामतीत पवारांचे दोन पाडवे साजरे झाले. अजित पवारांनी काटेवाडीत पाडवा साजरा केला. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार चिडले. त्यांनी “अदृश्य शक्तींना” दूषणे देत गोविंद बागेत पाडवा साजरा केला. अजितदादांनी त्या दोघांकडेही लक्ष दिले नाही. ते काटेवाडीत आपल्या समर्थकांसह पाडवा सण साजरा करण्यात मग्न राहिले. दोन्ही बाजूने आपल्याकडे जास्त गर्दी खेचल्याचे दावे केले.