• Download App
    Script 7 : राष्ट्रवादीत आली "राजकीय मंदी"; काँग्रेस नेत्यांनी "शोधली" पक्ष विस्ताराची संधी!! "Political meltdown" in NCP; Congress leaders "discovered" an opportunity for party expansion

    Script 7 : राष्ट्रवादीत आली “राजकीय मंदी”; काँग्रेस नेत्यांनी “शोधली” पक्ष विस्ताराची संधी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र पुरती शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस अशी सिंडिकेट – इंडिकेट अशी फूट पडल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी संपादक कुमार केतकर यांनी राष्ट्रवादीतल्या “राजकीय मंदीत” काँग्रेससाठी संधी शोधली आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यामुळे राष्ट्रवादीची शक्ती घटल्याने विरोधी पक्षांची “पॉलिटिकल स्पेस” रिकामी होत आहे आणि रिकामी स्पेस भरण्याची संधी काँग्रेस पक्षाला आहे, असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले आहे. “Political meltdown” in NCP; Congress leaders “discovered” an opportunity for party expansion

    शरद पवारांनी अखंड काँग्रेस फोडूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती त्यावेळी त्यांनी काँग्रेसची “पॉलिटिकल स्पेस” फोडून आपल्या पक्षासाठी “पॉलिटिकल स्पेस” तयार केली होती. काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर त्यामुळे मोठी हानी झाली होती, याची आठवण केतकरांनी करून दिली. पण त्याचवेळी आता राष्ट्रवादी फुटत असताना महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची संपूर्ण “पॉलिटिकल स्पेस” काँग्रेससाठी मोकळी होत असल्याचा असल्याचे निरीक्षणही केतकर यांनी नोंदविले आहे.

    महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधात साधारण 30 ते 35 % मतदान काँग्रेसनिष्ठ आहे. तो मतदार राष्ट्रवादी काँग्रेसमुळे विभागला गेला होता. आता तोच मतदार काँग्रेसकडे वळवून काँग्रेसची मतपेढी मजबूत करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या “राजकीय मंदीत” आली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी राजकीय चतुराई आणि चलाखी दाखवून संघटनात्मक पातळीवर जिल्हा आणि तालुका केंद्रीभूत मानून ताबडतोब बांधणीला सुरुवात करावी. याचा परिणाम सहा ते आठ महिन्यांमध्ये काँग्रेसला मिळू शकतो, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.

    सोनियानिष्ठ केतकर

    कुमार केतकर हे काँग्रेस मधले सोनियानिष्ठ म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र टाइम्सच्या संपादक पदी असताना देखील त्यांनी आपली काँग्रेस निष्ठा सोडली नव्हती. त्यांनी उघडपणे सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाची त्यावेळी वकिली केली होती. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसने कुमार केतकर यांना राज्यसभेवर नियुक्त केले. आता याच शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीतल्या “राजकीय मंदीत” काँग्रेससाठी संधी शोधली आहे.

    “Political meltdown” in NCP; Congress leaders “discovered” an opportunity for party expansion

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!