• Download App
    Political dynasty घराणेशाहीच्या वारसदारांच्या सत्तेवर यायच्या बोंबा; संजय राऊतांना मोदींच्या वारसदाराची चिंता!!

    Political dynasty घराणेशाहीच्या वारसदारांच्या सत्तेवर यायच्या बोंबा; संजय राऊतांना मोदींच्या वारसदाराची चिंता!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मध्ये संघ स्थानावर येऊन गेल्यानंतर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल, असा जो “जावईशोध” लावला, त्यावर संघ आणि भाजपमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या, पण त्यामध्ये मोदींचा वारसदार आत्ताच शोधायची गरज नाही, ही बाब अधोरेखित झाली, पण त्या पलीकडे जाऊन संजय राऊत यांनी मोदींच्या वारसदाराबद्दल जी “चिंता” व्यक्त केली, त्यातूनच घराणेशाहीच्या वारसदारांच्या सत्तेवर यायच्या बोंबा, पण संजय राऊतांना मोदींच्या वारसदाराची चिंता!! हे शीर्षक सुचले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या धोरणांमुळे खरंच आज बड्या राजकीय घराण्याच्या वारसदारांची सत्तेवर यायची बोंब झाली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, के. टी. रामाराव, उदयनिधी स्टालिन या सगळ्या बड्या राजकीय घराण्याच्या वारसदारांना पुढच्या निवडणुकीत आपण निवडून येऊ का नाही??, आपला पक्ष सत्तेवर येऊन बसेल का नाही??, याची कुठलीच गॅरेंटी उरलेली नाही. पण संजय राऊत यांनी त्याविषयी कुठली चिंता व्यक्त केली नाही, तर थेट मोदींचा वारसदार कोण असेल, याविषयी “चिंता” व्यक्त करून त्यांनी महाराष्ट्रातल्या व्यक्तीच वारसदार असल्याचा दावा केला.



    वास्तविक संजय राऊत यांनी आपल्या “अलौकिक राजकीय बुद्धीतून‌” बड्या राजकीय घराण्यातल्या वारसदारांना‌ सत्तेवर येण्यासंबंधी काही सल्ले दिले असते किंवा काही तोडगे, टोणे – टोटके सुचवले असते, तर ते समयोचित ठरले असते. मुस्लिमांचे लांगुलचालन चालन करा, पण सनातन धर्माला उगाचच शिव्या देत बसू नका. चारा घोटाळा, ड्रग्स घोटाळा, दुसऱ्याची बदनामी घोटाळा, दिशा सालियन वगैरे प्रकरणांमध्ये अडकू नका, असे लावताना वर उल्लेख केलेल्या सगळ्या वारसदारांना सांगितले असते तर बरे झाले असते.

    लोकसभा निवडणुकीनंतरच्या हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये त्याचा काही उपयोग तरी झाला असता. त्याचबरोबर या आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या बिहार आणि तामिळनाडू यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत कदाचित राऊतांच्या अनुभवाचा वापर झाला असता, पण राऊतांनी राजकीय घराण्याच्या वारसांना तसा कुठला सल्ला दिला नाही किंवा टोणे टोटके सूचविले नाहीत. त्यामुळे बड्या राजकीय घराण्यातले वारसदार सत्तेवर येण्यापासून वंचित राहिले. मोदी – शाह यांच्या धोरणामुळे सत्ता त्यांच्यापासून कायमची दुरावल्याची भीती निर्माण झाली, पण त्यावर देखील संजय राऊत यांनी कोणता जालीम उपाय काढून त्याचा “जादूटोणा” बड्या राजकीय घराण्यांच्या वारसदारांना सांगितला नाही. त्याउलट संघाच्या बंद दाराआड घडलेल्या चर्चांचे “संकेत” यांनी जाहीरपणे सांगितले. मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून पुढे यायचा “जावईशोध” लावला.

    पण राऊतांच्या या “जावईशोधाचा” ना संघाला फरक पडला, ना भाजपला फरक पडला. उलट देवेंद्र फडणवीस आणि भैय्याजी जोशी यांनी राऊतांचा “जावईशोध” पूर्ण फेटाळून लावला. वडील हयात असताना वारसदाराचा विचार करणे ही मोगली पद्धत आहे. भारतीय संस्कृती तशी पद्धत नाही, असा टोला पडणवीस यांनी संजय राऊत यांना हाणला, तर आत्ता वारसदार शोधायचा प्रश्न येतोच कुठे??, जो काही निर्णय व्हायचा, तो संघाच्या पद्धतीनुसार होईल आणि संघ तसा निर्णय घेईल, अशा मोजक्या शब्दांमध्ये भैय्याजी जोशी यांनी मोदींच्या वारसदाराचा प्रश्न तातडीने फेटाळून लावला. त्यामुळे राऊतांचा अनेक जावईशोधांसारखाच मोदींच्या वारसदाराचा “जावईशोध” देखील वाया गेला!!

    Political dynasty heirs are loosing power rapidly, but Sanjay Raut care’ about Modi heir

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस