विशेष प्रतिनिधी
ठाणे : उल्हासनगरमध्ये गायकवाड नातेवाईकांमधील 50 गुंठे जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादाला राजकीय रंग आला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचाच नातेवाईक असलेल्या शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या सगळ्या वादाची परिणीती भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी झाली. पोलिसांनी एक गणपत गायकवाड यांना अटक केली. कोर्टाने त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.Political color to dispute between Gaikwad relatives; BJP MLA Ganpat Gaikwad who fired, 11 days police custody
भाजप आमदार गणपत गायकवाड
यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे राजकारण तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदारासह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी त्या पाठोपाठ स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम निघून चौकशी सुरू केली.
आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणपत गायकवाड यांनी 6 गोळ्या फायर केल्या होत्या. या सर्व गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. गायकवाड 3 वेळा आमदार असून 2009 पासून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष आमदार राहिले आहेत.
शिवसेना नेते महेश गायकवाड हे माजी नगरसेवक असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महेश गायकवाड हे उल्हासनगर शिवसेनेचेही प्रमुख आहेत.
नेमके काय घडले?
कल्याण पूर्वेतील 50 गुंठे जमिनीच्या मालकी हक्कावरून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड या दोन नातेवाईकांमध्येच वाद सुरू आहे. या मुद्द्यावर 31 जानेवारी रोजी दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्ष शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगरमधील हिल्स लाइन पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोहोचले होते.
या गोळीबार प्रकरणामुळे विरोधी पक्षांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याची संधी मिळाली खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला.
Political color to dispute between Gaikwad relatives; BJP MLA Ganpat Gaikwad who fired, 11 days police custody
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंड सरकारला समितीने UCC ड्राफ्ट सादर केला; मुख्यमंत्री धामी म्हणाले- बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती
- INDI आघाडी शिल्लकच नाही; महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊन आल्यावर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!
- छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या सोडल्या पुड्या; फडणवीसांनी काढली सुळे – दमानियांची हवा!!
- राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!