• Download App
    Devendra fadnavis पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन; पण प्रत्यक्षात कारवाई कधी??, नागपूरकरांचा सवाल!!

    Devendra fadnavis पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन; पण प्रत्यक्षात कारवाई कधी??, नागपूरकरांचा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नागपुरातील दंगली दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना कठोर शासन करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलून दाखवला‌. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सरकारसह सर्वांची आहे असे त्यांनी विरोधकांना सुनावले, पण प्रत्यक्षात दंगलखोरांवर कारवाई कधी करणार??, असा सवाल नागपूरकरांनी केला.

    नागपूरच्या दंगली संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. दंगलीचा सगळा घटनाक्रम विधानसभेला सांगितला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सकाळी औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी प्रतिकात्मक कबर जाळली. परंतु तेव्हा धार्मिक पुस्तक जाळले अशी अफवा काही विशिष्ट घटकांनी पसरवली त्यामुळे सायंकाळची दंगल उद्भवली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    या दंगलीत विशिष्ट समाजालाच टार्गेट केले गेले. दगडफेकी मध्ये 33 पोलीस जखमी झाले. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या दंगलखोरांनी ट्रॉली भरून दगड आणले होते. त्यांनी तुफान दगडफेक केली. दंगलखोरांनी ठरवून विशिष्ट समाजाला टार्गेट करून गाड्यांची आणि घरांची जाळपोळ केली. पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ले केले. या हल्लेखोरांना सरकार बिलकुल सोडणार नाही. त्यांना कठोरातले कठोर शासन केले जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावेळी त्यांनी छावा सिनेमाने समाजात जागृती निर्माण केली, अशीही पुस्ती जोडली.

    – पोलीस उशिरा पोहोचले

    मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जरी दंगलखोरांना सोडणार नाही. पुन्हा कठोरातले कठोर शासन करू, असे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कारवाई कधी करणार??, असा सवाल नागपूरकरांनी केला. लाठा काठ्या तलवारी आणि पेट्रोल पंप हातात घेतलेले शेकडो दंगलखोर गल्ल्या गल्ल्यांमध्ये घुसून जाळपोळ करत होते, त्यावेळी शेकडो जणांनी घरातून पोलिसांना फोन केले पोलिसांची मदत मागितली परंतु पोलिसांची मदत वेळेवर आली नाही त्यामुळे दंगलखोरांना जाळपोळ करायला फावले. पोलीस तिथे उशिरा आले. ज्यावेळी संताप झालेला समाज दंगलखोरांच्या विरोधात रस्त्यावर उतरला, त्यावेळी पोलिसांनी दंगलखोरांना आवरण्याऐवजी महाल मधल्या नागपूरकर सामान्य जनतेलाच दमदाटी केली, असा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला. संजय सिंह नावाच्या पोलिस निरीक्षकाचा फोन दोन तास स्विच ऑफ होता, असा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला.

    Police will not spare any rioters, says Devendra fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस