• Download App
    सोलापूरात 32 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई; लिबरल जमातीने गायली मूलभूत अधिकार धोक्यात आल्याची रडगाणी!! Police took action against 32 chargesheeted guns in solapur

    सोलापूरात 32 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई; लिबरल जमातीने गायली मूलभूत अधिकार धोक्यात आल्याची रडगाणी!!

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये गुंड गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत हद्दपारी केली. त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. पोलिसांनी सोलापुरातून 32 गुंडांना हद्दपार केले. त्यावर त्या गुंडांनी न्यायालयात धाव घेतली पण न्यायालयाने त्यांची हद्दपारी वैध ठरवली. पण या हद्दपारीवरून लिबरल जमातीने मात्र रडगाणी गायली. Police took action against 32 chargesheeted guns in solapur

    सोलापूरमधील 32 गुन्हेगारांना लोकसभेचे मतदान होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कायम ठेवला. हे सगळे 32 गुन्हेगार कुठे ना कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि एमआयएम पक्षाशी संबंधित आहेत. 32 जणांना हद्दपार करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. या 32 जणांवर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

    रियाज हुंडेकरी, अंबादास करगुळे, अजहर रामपुरे, मोहसीन बागवान, मैनुद्दीन हत्तुरे, वाहिद विजापुरे, इलियास हुंडेकरी, गाजी जहागीरदार, वाजिद सालार, असिफ तुळजापुरे, इफ्तेकार तुळजापुरे, करमुल शेख, मोहसीन नदाफ,सादिक कुरेशी, अलीमुद्दीन कुरेशी, इब्राहिम कुरेशी, अल्ताफ कुरेशी, मतिन शेख, मो. सादिक शेख, तौफिक शेख, सोहेल कुरेशी, इरफान शेख, तौफिक हत्तुरे, गौस नालबंद, आरिफ नालबंद, मोईनुद्दीन नाईकवाडी, अबुबकर नाईकवाडी, तौसिफ नाईकवाडी, शहानवाज नाईकवाडी, उमर नाईकवाडी, अबुरिहान नाईकवाडी, मकबूल नाईकवाडी यांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे.

    सोलापूरचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी एकपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 32 जणांवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई केली होती. त्यांना सोलापूर शहरात 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 ते 7 मे म्हणजेच मतदानाच्या दिवशी रात्री 12.00 पर्यंत या कालावधीत प्रवेशास मनाई केली होती. या 32 जणांना तशा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. या कारवाईच्या विरोधात या 32 जणांनी न्यायालयात धाव घेतली होती.

    आमच्या मूलभूत हक्काचा भंग झाला आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी रियाज हुंडेकरी, गाजी जहागीरदार, तौफिक शेख, वाजिद सालार, आसिफ तुळजापुरे, तौफिक हत्तुरे, तौफिक शेख यांच्यासह 32 जणांनी न्यायालयाकडे केली होती. त्याविरोधात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी युक्तिवाद केला.

    लोकसभा मतदानाच्या दिवशी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या वेळेत मतदानासाठी शहरात येण्याची मुभा पोलिस उपायुक्तांनी आदेशात दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मूलभूत हक्काला बाधा येणार नाही. या 32 जणांवर एकपेक्षा अनेक गुन्हे दाखल आहेत, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास निवडणूक शांततेत पार पाडणे अशक्य आहे. त्यामुळे या 32 जणांची याचिका रद्द करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकील राजपूत यांनी केला.

    सरकारी वकिल राजपूत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी ही याचिका रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम झाली आहे. पण ही कारवाई कायम होताच लिबरल जमातीने देशात स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा ढोल वाजवला व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारापासून कोणालाही वंचित ठेवू शकत नाही परंतु भाजप सरकारने लोकसभेची निवडणूक आपल्याला अनुकूल जावी म्हणून अशा प्रकारच्या कारवाया केल्याची रडगाणी राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, मुग्धा धनंजय आदी लिबरल जमातीने गायली आहेत.

    Police took action against 32 chargesheeted guns in solapur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस