• Download App
    सांगलीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई: पाच दिवस कडक निर्बंध। Police take action against those who go out for morning walk in Sangli: Strict restrictions for five days

    सांगलीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; पाच दिवस कडक निर्बंध

    वृत्तसंस्था

    सांगली : सांगली जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातआजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अंतर्गत आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करून समज दिली. Police take action against those who go out for morning walk in Sangli: Strict restrictions for five days



    कोरोना संकटमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवस कठोर निर्बंध लागू केले. त्या अंतर्गत पहाटे फिरणे, व्यायाम आणि सायकलिंग अशा गोष्टींना बंदी घातली आहे. परंतु अनेकजण नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे आज सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर सांगली शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

    सांगली जिल्ह्यात मॉर्निंग वॉकला सुद्धा निर्बंध आहेत .मात्र आज सांगलीत अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी युवक दिसल्याने अशा युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना ताकीद दिली आहे. यापुढं रस्त्यावर दिसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

    Police take action against those who go out for morning walk in Sangli: Strict restrictions for five days

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस