विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील हाॅटेल मालक व मॅनेजर यांच्याशी हुज्जत घालून पैशांची मागणी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली म्हणून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले.Police sub inspector suspended for tarnishing image of police force
मिलन कुरकुटे,असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत. ते २१ ऑगस्टपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर होते.
या रजा कालावधीत कुरकुटे मंगळवारी (दि. २४) पुणे येथे शासकीय गणवेशासह गेले. पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कार्निव्हल या हॉटेलच्या मालक व मॅनेजरशी हुज्जत घालून पैशांची मागणी केली. याबाबतची माहिती मुंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिली.
पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशोभनीय कृत्याबद्दल त्वरित प्रभावाने कुरकुटे यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले. तसेच भारतीय संविधान अनुच्छेद ३११, २ (ब) अन्वये मिलन कुरकुटे यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे त्यावेळी देखील कुरकुटे यांचे निलंबन झाले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस नियंतत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. दरम्यान आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलिसांच्या कोरोना सेलमध्ये ते कार्यरत होते.
Police sub inspector suspended for tarnishing image of police force
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंच्या अटकेचा “डाव” उध्दव ठाकरे – अजित पवारांचा; भाजपच्या निशाण्यावर अनिल परब; केली सीबीआय चौकशीची मागणी
- पतीच्या विरहामुळे दोन मुलांचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न
- जालियनवाला बाग हत्या हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या शहीद उधम सिंह यांचे पिस्तूल आणि डायरी लंडनमधून परत आणा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र
- भाईजानला रोखणाऱ्या अधिकाऱ्याला बक्षीस : मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी सलमानला रोखणाऱ्या एएसआयला सीआयएसएफने बक्षीसही दिले, लोक म्हणाले – खरा सुपरहिरो