Tuesday, 6 May 2025
  • Download App
    बंडा तात्यांच्या सुटकेसाठी वारकऱ्यांचा टाहो। Police Stopped Warakaris to entre in collector office ; Warakaris teared copies of statement asking Release of Banda tatya karadkar

    बंडा तात्यांच्या सुटकेसाठी वारकऱ्यांचा टाहो

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून तातडीने सुटका करवी, अशी मागणी करायला गेलेल्या वारकऱ्यांना अडविण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या वारकऱ्यांनी निवेदनाच्या प्रती फाडून टाकून सरकार आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला. Police Stopped Warakaris to entre in collector office ; Warakaris teared copies of statement asking Release of Banda tatya karadkar

    वारकरी तात्यांच्या सुटकेसाठी शांततेच्या मार्गाने

    जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी आले. पण, त्यांना बाहेर रोखण्यात आले. त्यामुळे वारकरी संतप्त झाले आणि त्यांनी निवेदनाच्या प्रती फाडून टाकल्या आणि सरकारचा निषेध केला.

    बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेसाठी आज वारकऱ्यांनी सातारा पायी दिंडीचे आयोजन केले होते. मात्र मेढा पोलिसांनी विलासबाबा जवळ आणि वारकऱ्यांना स्थानबद्ध केलं. वास्तविक शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलकांना स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भजन आणि अभंग गात वारकऱ्यांनी ठाण मांडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाच्या प्रती फाडून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

    • बंडातात्यांच्या सुटकेसाठी वारकऱ्यांचा टाहो
    • सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रोखले
    • वारकरी- जिल्हाधिकारी यांची भेट नाही
    • वारकऱ्यांनी सुटकेच्या मागणीचे निवेदन फाडले
    • पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध
    • जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वारकऱ्यांचे ठाण
    • जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भजन – किर्तन
    • विलासबाबा जवळ आणि वारकरी स्थानबद्धच

    Police Stopped Warakaris to entre in collector office ; Warakaris teared copies of statement asking Release of Banda tatya karadkar

    Related posts

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    Icon News Hub