प्रतिनिधी
मुंबई : “आयएनएस विक्रांत” या युद्धनौका बचावासाठी निधी गोळा करण्या प्रकरणात किरीट सोमय्या यांना सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन नाकारला आहे त्यामुळे किरीट सोमय्या यांना अटक अटक करण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या मुंबई हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.Police preparing for Kirit Somaiya’s arrest; Neil Somaiya’s verdict tomorrow
विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरला, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स बजावले. या दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला,
मात्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन नाकारला, नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी, १२ एप्रिल रोजी निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अटकेसाठी मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, सोमय्या हे हायकोर्टात धाव घेणार असल्याचे समजते.
पोलिसांकडून अटकेची तयारी सुरू
आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांच्या विरोधात राज्य सरकारला पुरावे दिल्याचा दावा केला. त्यानुसार आर्थिक गैरव्यवहार विरोधी विभागाने याची दखल घेत सोमय्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने समन्स पाठवला आहे.
या समन्सनुसार, किरीट सोमय्या यांना 9 एप्रिल रोजी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र सोमय्या आलेच नाही. त्यांनी सोमवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सोमय्या यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुंदरगी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. दुसरीकडे पोलिसांनीही सोमय्यांना अटक करण्याची तयारी केली आहे.
Police preparing for Kirit Somaiya’s arrest; Neil Somaiya’s verdict tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- बिटकाॅईन गैरव्यवहारात तत्कालीन पाेलीसांची चाैकशी करण्याची मागणी सरकारने तपासासाठी तज्ञ समिती नेमण्याची गुंतवणुकदारांची मागणी
- “सिल्व्हर ओक” वरील दगड – चप्पल फेकीची होती विश्वास नांगरे पाटलांना पूर्वकल्पना!! – पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून माहिती उघड
- सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
- मध्य प्रदेशात खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगड फेकले; दगडफेक्यांच्या मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले!!