• Download App
    आमदार महेश लांडगे, वसंत मोरे, अविनाश बागवेंना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या इम्रान शेखला पोलिसांच्या बेड्या|Police handcuffs Imran Sheikh who threatened MLA Mahesh Landge, Vasant More, Avinash Bagh for extortion

    आमदार महेश लांडगे, वसंत मोरे, अविनाश बागवेंना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या इम्रान शेखला पोलिसांच्या बेड्या

    प्रतिनिधी

    पुणे : भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे मनसे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या इम्रान शेखला ट्रॅप करून पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. वेगवेगळ्या कारणांनी धमक्या देत इम्रान शेख याने या नेत्यांकडून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्या कथित प्रेयसीच्या नावाने मेसेज आणि फोन करून हे प्रकार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्यासाठी जाळे लावले आणि त्या जाळ्यात इम्रान शेख अलगद अडकला.Police handcuffs Imran Sheikh who threatened MLA Mahesh Landge, Vasant More, Avinash Bagh for extortion

    इम्रान शेख हा वेगवेगळ्या मोबाईल वरून अल्पिया शेख या नावाने धमकीचे मेसेजेस करत असल्याचे पोलिसांना आढळले. अल्पिया शेख ही त्याची एकतर्फी प्रेमाची प्रेयसी असल्याचा पोलिसांचा कयास आहे आणि तिला पोलिसांचा त्रास व्हावा या हेतूनच इम्रान शेख तिचे नाव वापरून बड्या नेत्यांना धमक्या देत असल्याचाही पोलिसांचा संशय आहे.



    इम्रान शेखला बेडा ठोकल्यानंतर पोलीस आज त्याला कोर्टात हजर करून त्याची चौकशी आणि तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

    इम्रान शेखने आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयात फोन करून खंडणी मागितली. त्यापूर्वी मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून त्यांना 30 लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच काँग्रेसचे पुण्यातले वरिष्ठ नेते, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याही ऑफिसमध्ये फोन करून त्याने खंडणी मागण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आणि खबऱ्यांच्या आधारे सायबर टीमची मदत घेत इम्रान शेखला ट्रॅप केले. त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या चौकशी आणि तपासातून अन्य कोणते धागेदोरे बाहेर येतात का??, हे पोलीस पाहणार आहेत.

    Police handcuffs Imran Sheikh who threatened MLA Mahesh Landge, Vasant More, Avinash Bagh for extortion

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस