किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे Police constable injured in katraj area
विशेष प्रतिनिधी
पुणे -किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे. पाेलीस शिपाई मनाेज बदडे असे जखमी झालेल्या पाेलीसाचे नाव आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलीसांनी आराेपी कैफ अरिफ शेख (वय-१८) याला अटक केले असून त्याचे साथीदार आमन मुल्ला, संकेत व एक आणखी साथीदार यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीसांकडे प्रतिम लाेणकर (वय-३०,रा.कात्रज,पणे) यांनी फिर्याद दिली आहे.
तक्रारदार प्रितम लाेणकर हा गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कात्रज चाैकातील हाॅटेल गणेश येथे मित्रांसाेबत चहा पिण्याकरिता गेला हाेता. त्याठिकाणी गाडी पार्क करत असताना, त्याचा एका २० वर्षीय तरुणासाेबत वाद झाला. त्यावेळी संबंधित तरुणाने त्याला शिवीगाळ करुन ‘तुला मी काेण आहे ते दाखविताे’ असे म्हणून त्याने त्याठिकाणी असलेल्या इतर साथीदारांना बाेलवून घेतले. त्यानंतर लाेणकर यास आमन मुल्ला व संकेत यांनी हाताने पकडून ठेवले व मारहाण केली.यावेळी कैफ याने त्याच्याकडील काेयता काढून ताे लाेणकर यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने वार केला. त्यावेळी सदर भांडणे पाहून जवळच वाहतूक नियमन करणारे पाेलीस शिपाई मनाेज बदडे धावत येऊन त्यांनी भांडणे साेडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कैफ याने वाहतूक पाेलीसावर काेयत्याने वार करुन त्याच्या करंगळीला जखम केली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहे.
Police constable injured in katraj area
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची मोठी घोषणा, म्हणाले – 2023 मध्ये माझी अखेरची निवडणूक, पण राजकारणात राहणार
- ‘मला तुरुंगात टाकायचे तर टाका..’ नातेवाईकांवरील कारवाई आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले
- Danish Azad Profile : योगींचे एकमेव मुस्लिम मंत्री दानिश आझाद, विद्यार्थी नेते ते यूपीचे मंत्री असा आहे राजकीय प्रवास
- बंगाल हिंसाचार : भाजप खासदार रूपा गांगुलींना संसदेत अश्रू अनावर, म्हणाल्या- बंगाल आता राहण्यालायक राहिला नाही!