वृत्तसंस्था
मुंबई : लालबाग गणपती उत्सव परिसरात पोलिसांनी दंडुकेशाही करून पत्रकारांना धक्काबुक्की केली. तसेच धमकावले. पत्रकारांनी पोलिस अधिकारी यांना हात लावू नका, असे बजावले. परंतु, या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब ,अशी गुंडगिरीची भाषा केली.Police brutality Invalid: Devendra Fadnavis
पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही. आता सरकारने आधी कारवाई करावी, मग चौकशी करा,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
- पोलिसांच्या दंडुकेशाहीचा फडणवीसांकडून निषेध
- लालबाग गणपती परिसरात गर्दी नव्हती
- पत्रकारांना पास असताना धमकावणे अयोग्य
- हात काय ,पाय सुद्धा लावून दाखवतो, अशी धमकी
- पोलिसांच्या या वर्तनामुळे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह
- अगोदर कारवाई करा, मग चौकशी करावी