प्रतिनिधी
अकोला : अकोल्यात दंगल घडवून आणणाऱ्या आणि दंगलीत सामील असलेल्या 63 जणांच्या महाराष्ट्र पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर IPC सेक्शन देखील असे लावण्यात आले आहेत की, त्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. Police arrested 63 rioters in Akola
कायद्याचा कठोर बडगा उभारून दंगलखोरांच्या योग्य पद्धतीने मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दंगलखोरांवर पोलिसांनी 147 ,148 ,149 ,306 ,302, 324, 337 आणि 338 ही कलमे लावली आहेत. यापैकी चौघांवर तर Arm’s Act नुसार कारवाई करून 135, 504 आणि 506 या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
दंगलीच्या रात्री – पहाटे 4 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दंगलखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आज सकाळी पिंपरी चिंचवड मध्ये दिले त्याच दरम्यान अकोल्यात पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा चालविला.
Police arrested 63 rioters in Akola
महत्वाच्या बातम्या
- सरकार विरोधात पोलीस – प्रशासनाला चिथावणी देणे संजय राऊतांना भोवले; राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
- परीक्षेची संधी : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा; डाॅ. भारती पवारांची ग्वाही
- Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!
- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही