Dombivli gang rape : अवघ्या देशात खळबळ उडवणाऱ्या डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी एकूण 33 आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींविरोधात कलम 376 (बलात्कार), 376 एन, 376 (डी) (ए) आयपीसी आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. Police arrested 2 more accused in Dombivli gang rape case, 32 out of 33 arrested so far
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अवघ्या देशात खळबळ उडवणाऱ्या डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी एकूण 33 आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींविरोधात कलम 376 (बलात्कार), 376 एन, 376 (डी) (ए) आयपीसी आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आतापर्यंत 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी 28 आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली आणि दोन आरोपींना काल रात्री अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील ठाणे येथे एका 14 वर्षांच्या मुलीवर 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्या आरोपीचाही शोध सुरू आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सामूहिक बलात्काराच्या संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी आतापर्यंत 32 आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे.
मित्राने केला बलात्कार, व्हिडिओही केला शूट
अल्पवयीन पीडितेच्या मित्राने 8 महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिचा अश्लील व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत असताना इतर आरोपींनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ही बाब उघड होताच पोलिसांनी तपासासाठी विशेष पोलीस दल स्थापन केले. पोलीस अधिकारी म्हणाले की, ही घटना डोंबिवलीच्या भोपर भागातील आहे. सुमारे 33 लोकांनी अल्पवयीन मुलासोबत सामूहिक बलात्काराची केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
अखेर धाडस करून अल्पवयीन पीडितेची पोलिसांत धाव
सततच्या अत्याचारामुळे आणि धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर धाडस करून मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर कारवाई करत मानपाडा पोलिसांनी आरोपींना डोंबिवली, बदलापूर, रविबाळे आणि मुरबाड भागातून अटक केली. असे सांगितले जात आहे की अटक केलेले अनेक आरोपी खूप प्रभावशाली आहेत. यातील बरेच लोक राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याची कलमे लावली आहेत.
Police arrested 2 more accused in Dombivli gang rape case, 32 out of 33 arrested so far
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली
- पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला, ग्वादरमध्ये बलुच बंडखोरांचे कृत्य
- ‘भारत बंदची हाक देणाऱ्या संघटना तालिबानी’, बीकेयू – भानुच्या अध्यक्षांचे वक्तव्य, राकेश टिकैतांवरही डागली तोफ
- पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : काय आहे हेल्थ कार्ड? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…
- सीमेवर चीन पुन्हा सक्रिय : लडाख सीमेवर तंबू ठोकले; आठ ठिकाणी लष्करी छावण्या, प्रत्येक ठिकाणी ८४ तंबू