वृत्तसंस्था
पुणे : दरवर्षीप्रमाणे आहे वर्षी 8 मार्चला वुमन्स डे साजरा केला जाणार आहे. पण यावर्षी 8 मार्चपासून तेजस्विनी नावाच्या PMPML मधून प्रत्येक महिन्यातील 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. PMPML will organize free travel for women on 8th of every month
पण या वेळेस विशेष म्हणजे 8 मार्च 2023 रोजी जगभरात मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर PMPML प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. PMPML प्रशासनाने पुढाकार घेऊन दर महिन्याच्या 8 तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यातील महिला वर्ग सध्या 8 मार्चची आतुरतेने वाट बघतोय.
पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात 19 मार्गावर तब्बल 24 तेजस्विनी बसेस सध्या सुरू आहेत. स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, अकुर्डी, चिंचवड, आप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा मार्गावर तेजस्विनी बस सुरू आहेत. व पुढे याच मार्गावर सुरू असलेल्या या बसेस महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास घडवून आणणार आहेत.
PMPML will organize free travel for women on 8th of every month
महत्वाच्या बातम्या