• Download App
    पीएमपी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन PMP employees will get salary as per 7th Pay Commission in the new year

    पीएमपी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन

    प्रतिनिधी

    पुणे : नववर्षात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात आयोगाच्या फरकानुसार वाढणाऱ्या वेतनाची निम्मी ५० % रक्कम जमा केली जाणार आहे. PMP employees will get salary as per 7th Pay Commission in the new year

    यानंतर जानेवारी २०२३ मध्ये आयोगाबाबत मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक होऊन सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरित ५० % वाढीनुसार वेतन देण्यात सुरूवात केली जाणार आहे.

    पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा यासाठी शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पीएमपीमध्ये या मागणीबाबत बैठक घेण्यात आली आणि हा निर्णय झाल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.

    • पीएमपी कर्मचाऱ्यांच्या आणखी कोणत्या मागण्या मान्य झाल्या?
    • पीएमपी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा निश्चिक करणे.
    • वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे.
    • डेपो परिसरात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे.
    • कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करणे
    • या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

    PMP employees will get salary as per 7th Pay Commission in the new year

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच

    Abhijeet Deepke : CJP संस्थापक अभिजीत दीपकेंना तरुणांनी थप्पड मारली:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जयपूरममध्ये आंदोलन करत होते, आंदोलकांची हल्लेखोरांना मारहाण

    Ajit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरण:’AAIB’च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?