विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या “एक है तो सेफ है” या घोषणेच्या बळावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या गादीवर!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शिवराज सिंह तसेच 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आझाद मैदानावर हजारो लाडक्या बहिणी लाडके शेतकरी, लाडके कामगार, दीन दलित बहुजन, त्याचबरोबर शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्याबरोबर सगळ्या राजकीय अटकळींना विराम देत एकनाथ शिंदे यांनी पहिल्या उपमुख्यमंत्री पदाची, तर अजित पवारांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या भव्य दिव्य सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी भारतभरातून साधुसंत, वारकरी संप्रदायाचे आचार्य त्याचबरोबर अन्य धर्मगुरू उपस्थित होते. या सगळ्यांना या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी अभिवादन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय आयुष्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली 2014 मध्ये मोदींनी त्यांना मुख्यमंत्रीपदी नेमले 2019 मध्ये महायुतीला बहुमत मिळून देखील त्यांचा हक्क ठाकरे आणि पवारांनी हिरावला होता. त्यानंतर अडीच वर्षांसाठी ते उपमुख्यमंत्री झाले, पण 2024 मध्ये महाराष्ट्रात महायुतीने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
या सोहळ्याला हजारो नागरिकांनी आझाद मैदानावर हजेरी लावली होती. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे हे नेते त्या सोहळ्याला उपस्थित नव्हते.
PM Narendra Modi congratulates Devendra Fadnavis on taking oath as Maharashtra CM
महत्वाच्या बातम्या
- Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित
- Defence संरक्षण अधिग्रहण परिषदेने 22 हजार कोटी रुपयांच्या पाच प्रस्तावांना दिली मंजुरी
- Eknath Shinde : एकीकडे एकनाथ शिंदेंची राजी – नाराजी; दुसरीकडे भाजपची हिंदू ऐक्याच्या नव्या राजकारणाची पायाभरणी!!
- Israeli mosques : इस्रायलच्या मशिदींमधून स्पीकर हटणार, पोलिसांना स्पीकर जप्त करण्याचे आदेश