विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवण्याची अपेक्षा आणि आकांक्षा बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार 400 पार चा नारा दिला. पण त्यांना आव्हान देणारी काँग्रेस प्रणितINDI आघाडी 300 च्या आतच अडकली!! खुद्द संजय राऊत यांच्या तोंडून हे “सत्य” बाहेर आले!!PM Modi sets target of 400 +, but INDI alliance limits itself under 300!!
टीव्ही 9 मराठीने घेतलेल्या लोकसभा कन्क्लेव्ह मध्ये संजय राऊत यांची मुलाखत झाली. त्या मुलाखतीत राऊत यांनी INDI आघाडी जिंकण्याचा आकडा जाहीर केला, आणि तो आकडा 290 निघाला. संपूर्ण देशात मोदी विरोधी लाट आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांची आघाडी 220 पार जाऊ शकत नाही, तर INDI आघाडी 290 जागा जिंकेल, असे राऊत म्हणाले.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुलभ तिसऱ्यांदा भाजपसाठी जनतेकडून कौल मागत आहेत. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमत मिळवलेच, पण 2019 च्या निवडणुकीत भाजप 300 पार देखील गेला. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी भाजपसाठी 370 या आकड्याचे टार्गेट ठेवले, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अबकी बार 400 पार अशी घोषणा दिली. त्यामुळे मोदींची महत्त्वाकांक्षा किती मोठी आहे, हे जनतेसमोर आले.
मोदींनी जाहीर केलेली आकड्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये किती यश येईल??, भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा स्ट्राईक रेट काय राहील??, याची उत्तरे प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच मिळतील, पण निदान महत्त्वकांक्षा तरी मोठी असल्याचे मोदींनी जाहीर केलेल्या आकड्यातून स्पष्ट झाले.
पण त्याच मोदींना आणि भाजपला आव्हान देणाऱ्या काँग्रेस प्रणित INDI आघाडीचे जागा वाटपाचे घोडे देखील अजून अडले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. येत्या 10 – 15 दिवसांमध्ये मतदानाच्या तारखाही जाहीर होतील, पण अजूनही INDI आघाडीचे जागा वाटप झालेले नाही. पण मोदींना आणि भाजपला हरवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या INDI आघाडीतल्या नेत्यांना आपल्या महत्त्वाकांक्षेचा आकडा देखील भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पार नेता आला नाही. संजय राऊत यांच्या तोंडून 290 एवढाच आकडा आला आणि INDI आघाडीची महत्त्वाकांक्षा देखील किती तोकडी आहे हे सगळ्या जनतेसमोर आले!!
PM Modi sets target of 400 +, but INDI alliance limits itself under 300!!
महत्वाच्या बातम्या
- गाडी गेली साईडिंगला, “आवतान” घेतले लावून; शिंदे + फडणवीसांवर बारामतीतल्या “मोदी प्रयोगाची” चाहूल!!
- सर्वसामान्यांना मोठा दिलासा, 100 औषधी होणार स्वस्त
- मुख्यमंत्री + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देऊन पवारांनी “लावून घेतले” बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाचे “आवतान”!!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मोदी सरकारने गहू खरेदीबाबत केली ही मोठी घोषणा