• Download App
    रोजंदारी करणाऱ्याचा मुलगा कसा बनला तीरंदाज, PM मोदींना प्रवीण जाधवने सांगितली संघर्षाची कहाणी । PM Modi Interaction With olympic game players archery pravin jadhav shares his story to pm modi

    रोजंदारी करणाऱ्याचा मुलगा कसा बनला तीरंदाज, PM मोदींना प्रवीण जाधवने सांगितली संघर्षाची कहाणी

    PM Modi Interaction With Olympic game players  : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात एक वर्षाच्या विलंबाने होणार आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यादरम्यान त्यांनी खेळाडूंकडून त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेतली आणि त्यांच्या पालकांशीही बातचीत केली. PM Modi Interaction With olympic game players archery pravin jadhav shares his story to pm modi


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात एक वर्षाच्या विलंबाने होणार आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यादरम्यान त्यांनी खेळाडूंकडून त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेतली आणि त्यांच्या पालकांशीही बातचीत केली.

    चर्चेदरम्यान पीएम मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या प्रवीण जाधव या युवा तिरंदाजाशीही संवाद साधला. पंतप्रधानांनी प्रवीणला विचारले की, तुमचे प्रशिक्षण अॅथलीटसाठी झाले होते, परंतु तुम्ही धनुर्विद्येमध्ये प्रवेश घेतला. हे कसे घडले? प्रवीण म्हणाला, “मी सरकारी अ‍कॅडमीमध्ये अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत असे. परंतु मी अशक्त होतो. म्हणूनच कोच म्हणाले की, तू दुसरा एखादा खेळ निवडून पाहा. त्यामुळेच मला तिरंदाजी देण्यात आली. त्यानंतर मी अमरावतीत तिरंदाजीचा खेळ चालू ठेवला.”

    पंतप्रधान म्हणाले की, मला तुमच्या बालपणीच्या संघर्षाची माहिती आहे आणि तुमचे वडीलही रोजंदारी मजुरी करत असत, परंतु आज तुम्ही या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहात, हे प्रेरणादायी आहे. तुम्ही एक कठीण जीवन जगला, परंतु लक्ष्य कधीही आपल्या डोळ्यांपासून दूर जाऊ देऊ नका. आपल्या आयुष्यातील प्रारंभिक अनुभवांनी तुम्हाला विजयी होण्यात मदत केली का?

    यावर प्रवीण म्हणाला की, “मला वाटायचं की मी इथे सोडलं तर आतापर्यंत मी जे काही केले ते सर्व संपेल. प्रयत्न करून ते यशस्वी करणं जास्त चांगलं.”

    मोदी म्हणाले की, तुम्ही एक विजेता आहात. आपले पालकही चॅम्पियन आहेत. मोदींनी त्याच्या पालकांना म्हटले की, तुम्ही काम करत असताना आपल्या मुलाला पुढे नेले आणि आज तुमचा मुलगा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी खेळणार आहे. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाची शक्ती काय असते, ते तुम्ही दाखवून दिले आहे. मोदी म्हणाले की, तुम्हाला काही करायचे असेल, तर संकटं तुम्हाला थांबवू शकत नाहीत. ते म्हणाले की, तुमच्या यशामुळे हेदेखील स्पष्ट झाले आहे की जर तळागाळात योग्य निवड केली गेली तर आपल्या देशातील प्रतिभा काहीही करू शकते. प्रवीणचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, जपानमध्ये उत्तम खेळा.

    PM Modi Interaction With Olympic game players archery pravin jadhav shares his story to pm modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य