विशेष प्रतिनिधी
नागपूर : Pune Vande Bharat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑनलाईनच्या माध्यमातून नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यासोबतच महाराष्ट्राला देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे या वंदे भारत एक्सप्रेसची पाहणी केली. एक्सप्रेसच्या उद्धाटनाला नागरिक देखील मोठ्या संख्येने पोहोचले होते. या गाडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते पुणे हा 16 तासांचा प्रवास आता केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.Pune Vande Bharat
नागपूर–पुणे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसची मागणी अनेक महिन्यांपासून सुरू होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने नागपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू रेल्वे स्थानकावरून अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच केएसआर बंगळुरू- बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील शुभारंभ केला. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर नागपूर रेलवे स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.Pune Vande Bharat
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. आम्ही रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती आणि त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या ट्रेनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत सुरू झालेल्या सर्व वंदे भारत ट्रेनमध्ये ही सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही ट्रेन 12 तासांत 881 किमी अंतर कापेल आणि सर्व प्रमुख स्थानकांवर थांबेल. यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी वाढेल, असेही फडणवीस म्हणाले.
वंदे भारतचे अंतर कमी करण्याची योजना
ही ट्रेन अहिल्यानगर ते दौंड आणि नंतर पुण्याला जावी अशीही आमची मागणी आहे. मार्ग बदलल्यामुळे अंतर 100 किलोमीटरपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अहिल्यानगर ते पुणे असा थेट मार्ग बनवावा, ज्याचा फायदा एमआयडीसीलाही होईल. याव्यतिरिक्त, आम्ही असेही सुचवले आहे की जर आपण संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे मार्गावर बांधल्या जाणाऱ्या नवीन एक्सप्रेसवेला अतिरिक्त अधिकार देऊन रेल्वेशी जुळवून घेऊ शकलो तर हे काम वेगवान होईल. रेल्वे प्रवास जलद होईल आणि आम्ही वेळ एक तासाने कमी करू शकू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नागपूर–पुणे वंदे भारतला थांबे किती?
ट्रेन 26101 पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 6.25 वाजता पुण्याहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी (नागपूर) येथे पोहोचेल.
ट्रेन 26102 अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता) सकाळी 9.50 वाजता अजनीहून सुटेल आणि रात्री 9.50 वाजता पुण्याला पोहोचेल.
ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्डलाइन स्थानकांवर थांबेल.
या ट्रेनमध्ये एकूण 8 कोच असतील ज्यामध्ये 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) आणि 7 चेअर कार (CC) असतील. यात 590 प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे. ज्यामध्ये 44 सीट ईसी आणि 546 सीट सीसी कोचमध्ये उपलब्ध आहेत.
चेअर कारचे तिकीट 1,595 रुपये असून एक्झिक्युटिव्ह क्लासचा दर अधिक आहे.
PM Modi Inaugurates Nagpur Pune Vande Bharat Express
महत्वाच्या बातम्या
- India Alliance इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सोमवारी काढणार मोर्चा
- महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!
- Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा
- Trump : ट्रम्प आर्मेनिया-अझरबैजानमधील 37 वर्षांचे युद्ध संपवणार; आतापर्यंत 6 युद्धे थांबवल्याचा दावा