• Download App
    मोदींकडूनच तर राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित काम; जनक घराण्याचे वारस + पद्माराजेंचे वारस काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात!! PM Modi followed the footsteps of rajarshi shahu maharaj, says direct descendants of kolhapur shahu maharaj

    मोदींकडूनच तर राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित काम; जनक घराण्याचे वारस + पद्माराजेंचे वारस काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : मोदींकडूनच तर राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित असणारे काम त्यामुळे जनक घराण्याचे वारस + पद्माराजेंचे वारस काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात अशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील स्थिती झाली आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांनी काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजीत सिंह घाटगे यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्या पाठोपाठ प्रिन्सेस पद्माराजे यांचे वारसदार राजवर्धन कदमबांडे शाहू महाराजांच्या विरोधात मैदानात उतरले. PM Modi followed the footsteps of rajarshi shahu maharaj, says direct descendants of kolhapur shahu maharaj

    कोल्हापुरात शाहू महाराजांनी तसेच काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या गादीच्या प्रतिष्ठेचा आणि निष्ठेचा मुद्दा समोर आणताच महायुतीने रणनीती आखत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कोल्हापुरात लावली आणि कोल्हापुरातली लढत थेट “गादी विरुद्ध मोदी” अशी करून टाकली. “मान देऊन गादीला, पण मत देऊ मोदीला” अशी घोषणा सर्वत्र फिरली. राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजीत सिंह घाटगे यांनीही मोदींच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मोदी इफेक्टचे तुफान कौतुक केले. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले सामाजिक समतेचे आणि सामाजिक न्यायाचे काम तर नरेंद्र मोदी संपूर्ण देशभर करत असल्याचा निर्वाळा समरजीत सिंह घाटगे यांनी दिला

    कोल्हापुरात घाटगेंच्याच नेतृत्वाखाली भाजपानेही “मान देऊ गादीला, पण मत देऊ मोदीला” असा प्रचार सुरू केला तर, शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनीही छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीच्या वेळी नेमके काय घडले??, याचा गौप्यस्फोट केला. संभाजी राजेंना राज्यसभेची उमेदवारी घेताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हाची अट घातली. त्यांना उमेदवारी नाकारायची होती म्हणूनच ही अट घातली, पण महाविकास आघाडी आता छत्रपतींच्या गादीचा मान या विषयाचे भांडवल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहू महाराज यांना पराभूत करण्यासाठी कोल्हापुरात आले होते, अशी टीका महाविकास आघाडी कडून सुरू झाल्याबरोबर राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वारसदार समरजीत सिंह घाटगे पुढे आले आणि त्यांनी मोदींच्या सरकारने सामाजिक न्यायाच्या घेतलेल्या निर्णयांची यादीच वाचली. आताच्या घडीला राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले सामाजिक न्यायाचे काम तर नरेंद्र मोदीच करत आहेत. महिलांचा सन्मान करण्यासाठी मोदींनी नारी शक्ती विधेयक संमत करून संसद आणि विधानसभेत 33 % महिला आरक्षण दिले, शिक्षणात सर्वांना समान संधी दिली, जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवून तिथे सामाजिक न्याय प्रस्थापित केला समाजातल्या सर्व वंचित आणि दुर्बल घटकांना सामाजिक न्यायाच्या सर्व योजना लागू केल्या. दलित, आदिवासी, वंचित घटकांना विविध सामाजिक सवलती देऊन त्यांना सन्मानाचे जीवन दिले ही सगळे कामे शाहू महाराजांना अपेक्षित होती ती नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली, अशा शब्दांमध्ये समरजीत सिंह घाटगे यांनी मोदी सरकारची कामगिरी सांगितली.

    त्या उलट शाहू महाराज ज्या काँग्रेसच्या हाताच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत ती काँग्रेस सामाजिक भेदभाव करून दलित वंचित ओबीसी यांच्या हक्काची संपत्ती मुस्लिमांना वाटायला निघाली आहे असा प्रखर हल्लाबोल समरजीत सिंह घाटगे यांनी केला. कोल्हापूर मधील लोकसभा निवडणूक ही दोन व्यक्तींमधील नसून दोन विचारांमधील असल्याचे देखील समरजितसिंह घाटगेंनी सांगितले.

    एकीकडे प्रिन्सेस पद्माराजे यांचे वारसदार राजवर्धन कदमबांडे काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात उतरले तर दुसरीकडे राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वारस समरजीत सिंह घाटगे यांनी देखील मोदींच्याच बाजूने आपला कौल दिला. त्यामुळे कोल्हापुरातली लढत मोदी विरुद्ध गादी आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच झाली आहे!!

    PM Modi followed the footsteps of rajarshi shahu maharaj, says direct descendants of kolhapur shahu maharaj

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!